शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आण्णा नगरमध्ये स्वच्छतेची, वाहतूककोंडीची समस्या

By admin | Updated: August 30, 2015 23:28 IST

येथील जुन्या डोंबिवली परिसरात असलेल्या दिवा-वसई रेल्वे लाइन लगतच्या आण्णा नगरमध्ये अवघे एक स्वच्छतागृह असून सुमारे २०० कुटुंबियांच्या वस्तीसाठी ते अपुरे आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीयेथील जुन्या डोंबिवली परिसरात असलेल्या दिवा-वसई रेल्वे लाइन लगतच्या आण्णा नगरमध्ये अवघे एक स्वच्छतागृह असून सुमारे २०० कुटुंबियांच्या वस्तीसाठी ते अपुरे आहे. येथे एक स्वच्छतागृह बांधले होते, परंतु ते उत्साहाच्या भरात भूखंडाच्या मालकीची खातरजमा न करता रेल्वेच्या जागेत बांधण्यात आल्याने ते शुभारंभापूर्वीच तोडण्यात आले, त्यामुळे तेथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याच ठिकाणी युटीडब्ल्यूटी (अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग) या अत्याधुनिक पद्धतीने रस्ता बांधण्यात येत असून त्याचे काम रात्री करण्यात येते आहे. चिंचोळा व नागमोडी रस्ता असल्याने दिवसा काम करणे शक्य नसल्याने फक्त रात्रीच ते करण्यात येत आहे. सध्याचा रस्ता हा चिखल, खड्डेमय असल्याने नागरिक त्रस्त आहेत. आधीच रस्ता लहान असल्याने एकाच वेळी दोन विरुद्ध दिशेने चारचाकी, अथवा मोठ्या गाड्या जातांना वाहतुकीची समस्या उद्भवते अशी स्थिती आहे. त्यात आता रस्त निर्मितीच्या कामाची भर पडली आहे. काही प्रमाणात स्लम, आणि इमारतींचा असा संमिश्र असा हा परिसर असून त्यात सर्वधर्मिय नागरिक वास्तव्यास आहेत. बहुतांशी नागरिक हे नोकरीनिमित्त मुंबईसह अन्यत्र जातात. त्यामुळे पाणी, रस्ते, वीज आणि दळणवळणाची साधने या त्यांच्या मुलभूत गरजा आहेत. राखीव भूखंडाचा आभाव असल्याने मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी येथील नागरिकांना डोंबिवलीच्या मध्यवर्ती भागात अथवा कोपर रोड, सखाराम नगरच्या लहान मुलांच्या उद्यान्यांवर अवलंबून राहावे लागते. अरुंद रस्ता आणि प्रतिसाद कमी असल्याने या ठिकाणी केडीएमटीची परिवहनची बस सेवा बंद करण्यात आली. आता येथील रहिवाशांची सर्व मदार ही रिक्षांवरच आहे. या ठिकाणीच महापालिकेचा कच-यापासून खत निर्मितीचा प्रकल्प होता, परंतु स्थानिकांमधील हेवेदावेसह अन्य काही कारणांमुळे तो बंद पडला. परिसरातीलच एका महिला संस्थेला तो चालविण्यासाठी देण्यात आला होता. तो ही त्यामुळे शहरात आता महापालिकेचा खत निर्मितीचा प्रकल्प नाही. केडीएमसीत कचऱ्याची समस्या जटील असतांना हा खत प्रकल्प बंद कसा पडला, असा सवाल नगरसेवकालाही विचारण्यात येतो. पण त्याचे उत्तर नाही.