शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

स्वच्छ भारत अभियानाचा सरावलीत बोजवारा

By admin | Updated: August 8, 2016 01:57 IST

मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत

बोईसर : मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी इतर साधनांचा (टूल्सचा) शुभरंभही झाला असून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ करीता काऊंटडाऊनही सुरू झाले असतानाच तारापूर एमआयडीसी क्षेत्राल लगत असलेल्या सरावली ग्रामपंचायतीने मात्र स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडवल्याची चित्र काही भागात दिसत आहे.सरावली ग्रामपंचायतीमध्ये सरावली हे मूळ गाव, वेगवेगळया ठिकाणी मोठया प्रमाणांत उभारण्यात आलेल्या इमारती व गृहसंकुले तर उर्वरीत ठिकाणी बैठया चाळीतील दाट संमिश्र लोकवस्ती तसेच तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांचा अंतर्भाव असून लोकसंख्येचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामध्ये गोरगरीब, कामगार वर्गाचे प्रचंड मोठया प्रमाणात वास्तव्य आहे. बैठया चाळी, नागरी वसाहतीतील कचरा नियमीत उचलला जात नसल्याने जागोजागी प्रचंड प्रमाणावर साचलेला कचरा त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी व त्यापासून होणारे साथीचे आजार याकडे पंचायतीचे लक्ष नाही. पालघर तालुका भाजपा झोपडपट्टी आघाडीचे बोईसर मंडळाचे अध्यक्ष संजू शेट्टी, पालघर तालुका भाजपा बोईसर मंडळचे सरचिटणीस बच्चन शुक्ला यांनी याबाबत सरावलीचे उपसरपंच प्रजित घरत व ग्राम विकास अधिकारी सुभाष किणी यांना या दुर्दशेचे दर्शन नुकतेच घडवले.सरावली ग्रामपंचायतीच्या ताफ्यामध्ये दोन ट्रॅक्टर व चोविस सफाई कर्मचारी आहेत मात्र तरीही कचरा नियमित उचलला जात नसल्याची तक्रारी तेथील ग्रामस्थांनी केल्या. प्यायचे पाणी पुरेशा दाबाने व नियमित येत नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. तर सिध्दार्थ नगर येथे साचलेल्या कचऱ्याच्या जवळील पाइपलाइनच्या एका व्हॉलच्या चेंबरमध्ये साचलेले दूषित पाणी तर दुसरा व्हॉल साचलेल्या दुर्गंधीयुक्त व चिखलात कसा अदृश्य झाला आहे तेही एका ग्रामस्थाने दाखवले, यामुळे साथीच्या आजारांची भीती व्यक्त होत आहे. स्वच्छता मोहिम राबविण्याचे भारत अभियान सुरूवातीला मोठया जोमाने सरावली ग्रामपंचायतीने राबविल्याचे नागरीक सांगताहेत परंतु आज पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता होत नाही कचरा वेळेवर व नियमीत उचलला जात नाही हे खरे वास्तव आहे खुर्चीवर व सत्तेत बसलेल्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना स्वच्छता मोहिम राबवल्यासंदर्भात गांभिर्य वाटत नसून उदासिनतेमुळे आज घडीला नागरी वस्तीमध्ये कचरा साठला आहे. त्यातून निघाणारी दुर्गंधी व फै लावणारे जंतू याबाबत वेळीच दक्षता न घेतल्यास ते जीवावरही बेतण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)