शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता झाली; पण दिखाव्यापुरतीच!

By admin | Updated: March 30, 2017 05:39 IST

एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे

डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्याला डम्पिंगचे स्वरूप आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तलाव आणि परिसरातील कचरा तातडीने उचलण्यात आला. परंतु, तलावातील पाण्याला पडलेला जलपर्णींचा विळखा कायम आहे. त्यामुळे केडीएमसीने केलेली स्वच्छता ही एक प्रकारे दिखावा ठरली आहे.केडीएमसीच्या या गणेश विसर्जन तलावाचे २००१ मध्ये सुशोभीकरण करण्यात आले. घरगुती गणपती विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली. परंतु, आजघडीला या तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले. निर्माल्यकलश असतानाही निर्माल्य तसेच घरातील कचराही तलावात सर्रासपणे टाकला जात असल्याने येथील प्रदूषण जलचर प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांअभावी येथील सुरक्षाही वाऱ्यावर पडल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.केवळ गणेशोत्सवात तलावाची स्वच्छता केली जाते. परंतु, त्यानंतर या तलावाकडे दुर्लक्ष होते. त्यात आता घरगुती गणपती, सार्वजनिक मंडळाचे तसेच मोठ्या उंचीच्या मूर्तींचेही येथे विसर्जन होत आहे. त्यामुळे येथील तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यातच रहिवासी घरातील कचरा, निर्माल्यही त्यात टाकत आहेत. या तलावाच्या दुरवस्थेच्या वास्तवाबाबत ‘लोकमत’ने नुकतेच ‘विसर्जन तलाव की डम्पिंग’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यावर तातडीने तलावातील आणि त्यालगतच्या भागातील कचरा महापालिकेने उचलला. मात्र, तलावातील पाण्याची स्वच्छता करण्यात आली नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावातील जलपर्णींची वाढ होऊन तलावातील पाण्यावर शेवाळाचा हिरवा तवंग पसरला आहे. ही वाढती जलपर्णी घातक असून पाण्यातील आॅक्सिजनच्या मात्राला ती मारक ठरत आहे. त्यामुळे तलावातील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. (प्रतिनिधी)