शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:06 IST

मुरबाड तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या असून पाणीपुरवठा विभागाकडे २२ गावे आणि ४७ वाड्यापाड्यांचे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव आले आहेत.

मुरबाड तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या असून पाणीपुरवठा विभागाकडे २२ गावे आणि ४७ वाड्यापाड्यांचे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली जात असल्याने टंचाईग्रस्त गावांना मागणी नुसार पाणीपुरवठा होत नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. बहुतेक ठिकाणी प्यायलाच पाणी मिळत नाही, तर शौचासाठी पाणी कोठून आणणार? यामुळे शौचासाठी अनेक ग्रामस्थांवर नाइलाजास्तव दगड, झाडाच्या पानांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील पाटगाव, खोपिवली, घागुर्ली, मेर्दी, कोळोशी, उमरोली खु., कोचरे, चासोळे खु., चासोळे बु., कळमखांडे, थितबी, झाडघर, तुळई, कळभांड मु., करवेळे, महाज, तळवली बा., वैशाखरे, साजई, सासणे, करचोंडे तसेच खेवारे ही २२ गावे आणि साकुर्ली ठाकूरवाडी, पाटगाव, वाघाचीवाडी, खांड्याचीवाडी, केवारवाडी, पेंढरी वाघवाडी, बांगरवाडी, बोरवाडी, लोत्याचीवाडी, उंबरवाडी, दिवाणपाडा, देवराळवाडी, भोईरवाडी, मोडकपाडा, दुर्गापूर, कळभांड वाघवाडी, दांडवाडी, मुरब्याचीवाडी, वैतागवाडी, भांगवाडी, पादीरवाडी, गुमाळवाडी, शिळंद, पांडूचीवाडी, गेटाचीवाडी, चिंचवाडी, आंबेमाळी, कान्हार्ले, कातकरीवाडी, बनाचीवाडी, बांधणपाडा, धापडपाडा, सोकाळवाडी, मेंगाळवाडी, उंबरपाडा, लाकूडपाडा, प्रधानपाडा, गोड्याचापाडा, मोहरईपाडा, तोंडलीपाडा, टेपाचीवाडी, शिवेचीवाडी, शिरोशी कातकरीवाडी व खुटारवाडी, शिरवाडी, धारखिंड आणि मांडवत या ४७ वाड्यापाड्यांवर भीषण पाणीटंचाई असून पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव सादर झाले आहेत. सध्या जे टँकर मिळत आहेत, ते पाणी ग्रामस्थांना पुरेसे नाहीत.प्यायलाच पाणी कमी पडते, तर कपडे, भांडी आणि शौचालयासाठी पाणी आणणार कुठून, असा यक्षप्रश्न लोकांना पडला आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी देऊ शकत नसल्याने अनेकांनी त्यांना जंगलात सोडून दिले आहे. अनेकांना दूरवरून डोक्यावरून पाणी आणावे लागते. पिण्यासाठी तसेच जेवणासाठी या पाण्याचा वापर होतो. शौचासाठी आम्ही झाडाच्या पानांचा वापर करतो, असे अनेक ग्रामस्थांनी खासगीत सांगितले. उघड्यावर शौचास बसणे आम्हाला आवडत नाही. मात्र, नाइलाजास्तव असे करावे लागते. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असून त्याचा आमच्या आरोग्यावर घातक परिणाम होणार आहे. आमच्या घरातील महिलांची यामुळे अडचण होते आहे. प्रशासनाने आम्हाला पुरेशा पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असल्याचे यावेळी अनेक ग्रामस्थांनी सांगितले. त्यातच, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांना शौचालयाचा वापर बंधनकारक असल्याने सध्याची परिस्थिती उघडकीस आली, तर त्यांची पदे धोक्यात येऊ शकतात. यामुळे सध्या याठिकाणी आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.>पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचास जावे लागते, हे प्रशासनासाठी निंदनीय आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियान हे अभियान न राहता सरकारची फसवेगिरी ठरली आहे.- चेतनसिंह पवार, सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश