शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत नाल्यांच्या सफाईला उल्हासनगरमध्ये सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 23:53 IST

३५ डंपर निघाला कचरा : ‘वालधुनी’च्या स्वच्छतेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाईला सुरुवात केली असून, एकट्या समतानगर एमजेपी ग्राउंडशेजारील नाल्यातून ३५ डंपर कचरा निघाल्याची माहिती नगरसेविका मीना सोंडे यांनी दिली, तर दुसरीकडे वालधुनी नदी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असल्याची प्रतिक्रिया उल्हास-वालधुनी नदी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली.उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यात नाले तुंबून पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई दोन टप्प्यांत सुरू केली आहे. नालेसफाईचे कंत्राट दिले असून, गेल्या काही दिवसांपासून नालेसफाईला वेग आला आहे. प्रत्येक प्रभागात कंत्राटी कामगार नाल्याची सफाई करीत असून, नगरसेवक स्वतः उभे राहून कामावर लक्ष ठेवत आहेत. कॅम्प नं. ५ एमजेपी ग्राउंड येथील समतानगर, कैलासनगर येथील नाला प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, लाकडी वस्तू, दगड-मातीने तुंबला होता. नगरसेविका सोंडे यांनी नालेसफाईची मागणी केल्यावर, जेसीबीने नाल्याची सफाई केली. तब्बल ३५ डंपर कचरा नाल्यातून निघाल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील बहुतांश नाल्यांची हीच परिस्थिती असल्याची माहिती त्यांनी दिली.

शहरातील लहान-मोठ्या नाल्याची साफसफाई होत असताना वालधुनी नदीसह खेमानी व गुलशन नाल्याची सफाई कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वालधुनी नदीची सफाई वडोलगाव येथून थेट शांतीनगर, सी ब्लॉकपर्यंत करावी, अशी मागणी दायमा यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील नाल्याची सफाई महापालिकेने सुरू करावी, असे दायमा यांनी सुचविले आहे.  सफाईतून निघालेला कचरा थेट डम्पिंगवर टाकण्याची मागणी केली जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही सफाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली.

नदीच्या सफाईला प्राधान्य द्या शहराच्या मधून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या साफसफाईला प्राधान्य द्या, अशी मागणी नगरसेवक गजानन शेळके यांनी केली आहे. नदी कचऱ्याने तुंबल्यास वडोलगाव, अशोक साम्राटनगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, अवधनगर, हिराघाट, शांतीनगर आदी परिसराला पुराचा धोका असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी यापूर्वी झाली असल्याचे शेळके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीच्या साफसफाईला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे