शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ डोंबिवली-स्वस्थ डोंबिवली’चा नारा

By admin | Updated: April 7, 2016 01:15 IST

‘अस्वच्छ शहर’ असा शहरावर लागलेला डाग पुसून काढण्यासाठी यंदाच्या स्वागतयात्रेत ‘स्वच्छ डोंबिवली-स्वस्थ डोंबिवली’चा नारा दिला जाणार आहे

जान्हवी मोर्ये,  डोंबिवली‘अस्वच्छ शहर’ असा शहरावर लागलेला डाग पुसून काढण्यासाठी यंदाच्या स्वागतयात्रेत ‘स्वच्छ डोंबिवली-स्वस्थ डोंबिवली’चा नारा दिला जाणार आहे. त्याचबरोबर, जलजागृतीसाठी सर्वत्र १० हजार पोस्टर्स लावली जाणार आहेत. नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह जपताजपता सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम राखली जाईल, अशी भावना यात्रेच्या संयोजिका दीपाली काळे यांनी व्यक्त केली. भजन दिंडीच्या निमित्ताने यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग वाढल्याचा, त्यातील पालखी लीलया पेलल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आस्थेने केलेल्या चौकशीची आठवण सांगत पर्यावरण वाचवण्याबाबत आणि ‘बेटी बचाव’वर सुरू असलेले काम यात्रेतून पोहोचवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीत सध्या रस्ते विकासाची कामे सुरू आहे. त्यानुसार, स्वागतयात्रेचा मार्ग ठरवावा लागतो. महापालिकेने ही कामे लवकर पूर्ण केल्यास सण, उत्सवाला अडथळा होणार नाही, असे सुचवतानाच वेगाने गाड्या चालवणाऱ्यांवर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून सुरू असलेल्या कारवाईबद्दल, त्यासाठी गणेश मंदिर संस्थानने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थानने हाती घेतलेल्या ग्रंथालयाचे काम सुंदर झाले आहे. त्यातून, अत्याधुनिक ग्रंथालय उपलब्ध होणार आहे. याचा अभिमानाने उल्लेख करतानाच त्यांनी स्वागतयात्रा ही एकाच वेळी आध्यात्मिक आणि सामाजिक उद्देशाने निघते. त्यातून जनजागृती होते. समाजाला सोबत घेण्याची भावना मोठी आहे. ती यापुढेही कायम राहील, यावर भर दिला. देणं तरुणाईचं : स्वागतयात्रेच्या पहिल्या वर्षापासून तरुणाईचा समावेश आणि सहभाग मोठा आहे. तो दिवसेंदिवस वाढतो आहे. यंदाच्या वर्षी मांडलेल्या सेल्फीच्या संकल्पनेपासून तरुणाईच्या नवनवीन संकल्पनांचे त्यांनी कौतुक केले. तरुणाईच्या सक्रिय सहभागामुळे नववर्ष स्वागतयात्रा टॅक्नोसॅव्ही झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही काळे यांनी केला. भित्तीचित्रे रंगवण्याची स्पर्धा ही कल्पनाही तरुणाईचीच आहे. शहराचे विद्रूपीकरण रोखण्याचा तो चांगला प्रयत्न आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.