शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडव्हान्स प्रकरणी सर्व नगरसेवकांना क्लीन चिट

By admin | Updated: November 12, 2015 01:17 IST

बदलापूर पालिकेच्या बीएसयूपी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ठेकेदाराला मोबिलायझेशन अ‍ॅडव्हान्स (कामाआधी आगाऊ रक्कम) दिल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षांसह

बदलापूर : बदलापूर पालिकेच्या बीएसयूपी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ठेकेदाराला मोबिलायझेशन अ‍ॅडव्हान्स (कामाआधी आगाऊ रक्कम) दिल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षांसह ३५ नगरसेवकांना शासनाने क्लीन चिट दिली आहे. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी त्यांच्याकडे झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय दिला आहे. बदलापूर पालिकेत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरी गरिबांना घरे (बीएसयूपी) हा घरकुल प्रकल्प राबवण्यात येत आहे. या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये नसतानादेखील संबंधित ठेकेदाराला ५ कोटी ८० लाख रु पयांचा अ‍ॅडव्हान्स दिला होता. या प्रकरणी राज्य शासनाकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच विनायक जाधव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेचा ठराव रद्द केल्यावर संबंधित ठेकेदाराने घेतलेली आगाऊ रक्कम व्याजासहित परत केली. मात्र, चुकीच्या पद्धतीने हे काम झाल्याने नगरसेवकांवरील आरोप कायम राहिले होते. यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेणे आवश्यक असल्याने या प्रकरणाची सुनावणी नगरविकासमंत्र्यांकडे सुरू होती. या सुनावणीत तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरण्यात आली. त्याप्रमाणे नगरविकास राज्यमंत्र्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष तसेच त्यांच्यासह ३५ सदस्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय दिला आहे. बदलापूर पालिकेत घोटाळ्यांमुळे नगरसेवक अडचणीत आले असताना या निर्णयाने तत्कालीन ३५ नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीएसयूपीचे काम करताना बदलापूर पालिकेने जिल्ह्यातील सर्वात कमी दराने निविदा मंजूर केल्या होत्या. तसेच या कामाच्या ठिकाणी रस्त्यांत असलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी व कामाचा वेग वाढवण्यासाठी ठेकेदाराकडून बँक गॅरंटी घेऊन ही आगाऊ रक्कम दिली होती. मात्र, ठराव रद्द झाल्यानंतर ठेकेदाराकडून ४२ लाख रुपयांच्या व्याजासह रक्कम परत घेतल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान झाले नव्हते. याच आधारे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी निर्णय दिल्याने आम्हाला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रि या राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केली आहे.