शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास नागरिकांना होणार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:35 IST

सरकारने अधिसूचना काढून राज्यातील सर्व महापालिकांसह नगरपालिका, नगरपंचायतींसाठी घनकचरा, स्वच्छता व आरोग्य उपविधी अमलात आणले आहेत.

- धीरज परबमीरा रोड : सरकारने अधिसूचना काढून राज्यातील सर्व महापालिकांसह नगरपालिका, नगरपंचायतींसाठी घनकचरा, स्वच्छता व आरोग्य उपविधी अमलात आणले आहेत. यामुळे ओला-सुका आणि घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास तसेच वेगळा करून न दिल्यास दंड आकारला जाणार आहे. या उपविधीनुसार बांधकाम कचरा (डेब्रिज) टाकणे, कचरा जाळणे, खुल्या जागेवर लघुशंका - प्रातर्विधी करणे, अंघोळ करणे, प्राणी-पक्षी यांना खाऊ घालणे आदींवर प्रतिबंध घातला आहे.केंद्राच्या पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम अमलात आणल्यानंतर एक वर्षाच्या आत नागरी स्वराज्य संस्थांनी उपविधी तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. परंतु, या संस्थांनी कार्यवाही न केल्याने गेल्यावर्षी सरकारने प्रारूप उपविधी प्रसिद्ध करून नागरी स्थानिक संस्थांकडून हरकती, सूचना मागवल्या होत्या. त्या अनुषंगाने सरकारने १ जुलैपासून उपविधीची अधिसूचना काढून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित केली आहे. राज्यातील महापालिकांसाठी काढलेल्या अधिसूचनेतील मंजूर उपविधीनुसार यापुढे सार्वजनिक तसेच खाजगी जागेवर कचरा फेकणे तसेच ठेवण्यास मनाई केली आहे. वाहनांमधून प्रवास करताना बाहेर कचरा टाकल्यास कारवाई होणार आहे.डेब्रिज सार्वजनिक वा खाजगी जागेत टाकता येणार नाही. हा कचरा वेगळा ठेवून महापालिका वा त्याच्या कंत्राटदारामार्फत आवश्यक शुल्क भरून विल्हेवाट लावावी लागेल. बगिचा, फलोद्यान, फांद्यांच्या छाटणीचा कचरा शक्यतो त्याच ठिकाणी खतात रूपांतरित करणे आवश्यक आहे. महापालिकेनेही त्यासाठी आवश्यक संकलनव्यवस्था करायची आहे. कचरा निर्माण करणाºया प्रत्येकास कचरा गोळा करून पालिकेस शुल्क द्यावे लागेल. अ व ब वर्ग महापालिकेत प्रत्येक घरास महिना ६० रुपये, तर क आणि ड वर्ग महापालिकेतील प्रत्येक घरास महिना ५० रुपये शुल्क पालिकेस द्यावे लागणार आहे. फेरीवाल्यांना प्रतिमहिना अनुक्रमे १८० आणि १५० रुपये भरावे लागतील.याशिवाय विविध प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, रुग्णालये, दवाखाने, धार्मिक संस्था, शोरूम, शैक्षणिक संस्था, विवाह कार्यालये, मल्टिफलेक्स, हॉटेल आदींनाही शुल्क द्यावे लागणार आहे. या शुल्कात दरवर्षी पाच टक्क्यांप्रमाणे वाढ होणार आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर पालिका प्रशासन गांभीर्याने कार्यवाही करणार का हा खरा प्रश्न आहे.>असा आकारला जाईल दंड :ओला व सुका कचरा तसेच धोकादायक कचरा हा वेगळा करून देणे बंधनकारक आहे. कचरा वेगळा करून न दिल्यास अ व ब वर्ग महापालिकेतील नागरिकांना पहिल्या वेळी ३०० रु. व त्यानंतर ५०० रु. दंड आकारला जाणार आहे. क व ड वर्ग महापालिकेतील घरमालकास पहिल्या वेळी २०० रु. व त्यानंतर ३०० रु. इतका दंड भरावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून तीन हजारांपासून १५ हजारांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे. कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याचे उल्लंघन करून कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे.