शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तलावांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकावे - नूतन बांदेकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 5, 2023 15:54 IST

पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

ठाणे : गेल्या अनेक शतकांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाण्याची ओळख तलावांचे शहर अशी होती. मात्र आजच्या समृद्ध ठाणे शहराची ही ओळख पुसली जातेय की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. ती ओळख जपायची असेल तर ठाणेकर नागरिकांनी तलावांच्या संवर्धनासाठी स्वतः एक तरी पाऊल उचलणे गरजेचे आहे." असे लेखिका नूतन बांदेकर यांनी रसिक वाचक समूहाच्या पुस्तक परिचय कार्यक्रमात बोलताना सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या की 'ठाणे तेथे काय उणे' असे असले तरी समृद्ध असलेल्या आजच्या नव्या ठाण्यात अनेकांना ही ओळख माहीतही नाही. ६० पेक्षा अधिक तलाव असलेल्या ठाण्यात आज प्रत्यक्ष किती तलाव आहेत हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी तलावांची शोध मोहीम सुरू झाली आणि त्या प्रवासात अखंडपणे ४२ तलावांची शब्दचित्रे रेखाटली गेली. त्यांचेच पुस्तकरूपात एकत्रीकरण झाले. तलावांच्या शोध मोहीमेदरम्यानचे अनेक प्रसंग, अडचणी आणि चांगले अनुभव याबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की प्रत्येक तलावाची एक कथा आहे, एक व्यथा आहे. ती समजून घेण्यासाठी किमान आपल्या जवळच्या तलावाला भेट देऊन त्याला जाणून घेणे आवश्यक आहे.

यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यात सर्व पर्यावरण प्रेमी आणि ठाणेकर जनतेने सहभागी होऊन तलाव संवर्धनासाठी आपले योगदान दिले पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या तलावाची ओळख करून देण्यात येत आहे. पुढच्या पिढीला पर्यावरण संवर्धनाचे धडे आतापासूनच दिले जावेत आणि ठाणे शहरातील तलावांचे भविष्य जपले जावे. असा महत्त्वाचा विचार माझा तलाव मोहिमेमागे आहे. तसेच 'सफर तलावांची' ही दोन भागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तलावांच्या सहलीविषयी देखील त्यांनी माहिती दिली. रसिक वाचक समूह आयोजित या पुस्तक परिचय व्याख्यान मालेतील आजचे ७६ वे पुष्प ऑनलाईन पद्धतीने गुंफले. समूहाचे प्रतिनिधी भूषण मुळ्ये यांनी, लेखिका बांदेकर यांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणे