शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘युजर फी’विरोधात नागरिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:00 IST

उल्हासनगरमध्ये स्वाक्षरी अभियान : तातडीने रद्द करण्याची मागणी

उल्हासनगर : मालमत्ताकराच्या बिलात युजर फीच्या नावाखाली निवासी बांधकामांना वर्षाकाठी ७५० रुपये, तर वाणिज्य आस्थापनांना ११२५ रुपये अतिरिक्त कर लावण्यात आला असून ही फी तातडीने रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याकरिता स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.महापालिकेच्या ‘युजर फी’च्या निषेधार्थ सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध भागांत स्वाक्षरी अभियान राबवण्यास प्रारंभ केला आहे. आमदार ज्योती कलानी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी व नगरसेवकांनी या फी आकारणीला विरोध केला आहे.

उल्हासनगर पालिकेच्या मालमत्ताकर विभागाकडून नवीन मालमत्ताकर बिलाचे वितरण करण्यात येत आहे. सुरुवातीला पालिका प्रशासनाकडून आलेल्या स्वच्छताकर प्रस्तावाचे सत्ताधारी भाजपकडून स्वागत झाले होते. मात्र, शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीआरपी व भारिप यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर, सदर प्रस्ताव फेटाळण्यात आला. आता बिलात दाखवलेली युजर फी स्वच्छताकराचेच नवे नाव आहे का व कोणाच्या मंजुरीनंतर लागू करण्यात आली, असा प्रश्न केला जात आहे.

दरम्यान, स्थायी समिती व महासभेत युजर फीला मान्यता दिल्यानंतरच ती मालमत्ताकराच्या बिलात समाविष्ट केल्याची माहिती उपायुक्त युवराज भदाणे यांनी दिली. युजर फीपासून पालिकेला वर्षाकाठी १५ ते २० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे भदाणे म्हणाले. पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी स्वाक्षरी अभियानाला पाठिंबा दिला असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सत्ताधारी भाजपा-ओमी टीम, साई पक्षासह शिवसेना यांनी मिठाची गुळणी घेतली आहे.