शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीमुळे नागरिक हैराण; उल्हासनगरमध्ये डम्पिंगचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:46 IST

खोकला, दमा, श्वसनाचा जाणवतोय त्रास

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उल्हासनगर महापालिकेचे म्हारळ येथील राणा कम्पाउंडजवळील डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्यामुळे कॅम्प नं. ५ येथील खडी मशीन येथे नवीन डम्पिंग ग्राउंड सुरू झाले आहे. हा रहिवासी परिसर असून कचºयाच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहे. या परिसरात राहणाºया सुमारे ५० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंगाला खाज, खोकला, श्वसनाला त्रास, मळमळ, दमा, क्षयरोग आदी रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती भाजपचे पदाधिकारी राजा गेमनानी यांनी व्यक्त करून रहिवासी भागातील डम्पिंग हटवण्याची मागणी पालिका आणि राज्य शासनाकडे केली आहे. डम्पिंगची ही जागा बदलण्यासाठी नगरसेवक आणि नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. महासभेतही नगरसेवकांनी या समस्येकडे लक्ष वेधून ही मागणी लावून धरली होती. डम्पिंगला वाढता विरोध बघून महापालिकेने राज्य शासनाकडे पाठपुरावा करून डम्पिंगसाठी शहर परिसरात भूखंड देण्याची मागणी केली होती. सहा महिन्यांपूर्वी उसाटणे येथील एमएमआरडीएच्या जागेतील ३० एकर जागा तत्त्वत: देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, अद्याप हा भूखंड पालिकेच्या ताब्यात मिळालेलानाही.कॅम्प नं. ५ येथील खडी मशीन येथील डम्पिंग ग्राउंडही एक-दोन वर्षांत ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याआधीच महापालिकेला डम्पिंगसाठी नवीन जागा मिळणे आवश्यक आहे. उसाटणे येथे महापालिकेला तत्त्वत: मंजूर झालेला भूखंड न मिळाल्याने कोंडी झाली आहे.डम्पिंगच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचा प्रसार होत असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या परिसरात २४ तास सुरू असलेले आरोग्य केंद्र पालिकेने सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच हाजिमंलग परिसरात असंख्य भूखंड असून त्यापैकी एक डम्पिंगसाठी देण्याची मागणीही होत आहे.डम्पिंग विरोधात आंदोलनअनेक आंदोलने झाली; मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. डम्पिंग हटवण्याची मागणी राज्य शासनासह पालिकेकडे लावून धरली असून डम्पिंगविरोधात मोठे अांदोलन उभारण्याचा इशारा भाजपचे शहर महासचिव राजा गेमनानी यांनी दिला आहे. शिवसेनेनेही याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :dumpingकचरा