शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

क्लस्टरसाठी सिडकोने कसली कंबर, सहा यूआरपींना सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 06:54 IST

CIDCO : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहावरून सरकारने  ठाणे महापालिका हद्दीतील सहा यूआरपींना मंजुरी दिली आहे.  यासाठी ठाणे महापालिकेने खास क्लस्टर सेलची निर्मिती करून त्याची धुरा गेल्या वर्षी पाच अधिकाऱ्यांवर सोपवली होती.

- नारायण जाधव

ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींतील रहिवाशांचे जीणे सुकर होण्यासाठी आणलेल्या बहुचर्चित क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसाठी आता सिडकोनेही कंबर कसली आहे. राज्यातच नव्हे देशात नवी शहरे वसविण्यात आघाडीचे नाव असलेल्या सिडकोचा ठाण्याच्या क्लस्टरमध्ये सहभाग करून घेण्याचा ठराव ठाणे महापालिकेने मंजूर केल्यानंतर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडकोने कामास सुरुवात केली आहे. त्यासाठी खास ठाण्याच्या क्लस्टरसाठी सिडकोने कंत्राटी तत्वावर नगररचना तज्ज्ञांचा शोध सुरू केला आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहावरून सरकारने  ठाणे महापालिका हद्दीतील सहा यूआरपींना मंजुरी दिली आहे.  यासाठी ठाणे महापालिकेने खास क्लस्टर सेलची निर्मिती करून त्याची धुरा गेल्या वर्षी पाच अधिकाऱ्यांवर सोपवली होती. पाच नव्या नगररचनाकारांमध्ये संचालक पु.म. शिंदे, सहायक संचालक दीपाली बसाखेत्रे यांच्यासह क्लस्टर सेलसाठी कृष्णा हणमंत शिंदे, श्वेता संजय माने आणि कुणाल मुळे यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते किसननगर येथे क्लस्टर योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, पुढे काहीच हालचाल न झाल्याने दबक्या आवाजात टीका होऊ लागली हाेती. यानंतर आता उशिरा का होईना गेल्या वर्षी क्लस्टरसाठी पाच अधिकारी दिले होते. त्यानंतर महापालिकेने ठराव करून म्हाडासह सिडकोची मदत घेण्याचा ठराव केला होता. हा ठराव मंजूर झाल्यानंतर कोरोनाची साथ आल्याने क्लस्टरचे काम रेंगाळले होते. आता सिडकोने ठाण्याच्या क्लस्टरसाठी नगररचना तज्ज्ञांचा शोध सुरू केला आहे.

पावणेपाच लाभार्थ्यांना लाभ ठाणे पालिकेच्या हद्दीत मंजूर केलेल्या सहा युआरपींचा पावणेपाच लाख लाभार्थ्यांना लाभ होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यामध्ये कोपरी (४५.९० हेक्टर), किसननगर (१३२.३७ हेक्टर), राबोडी (३५.४ हेक्टर), हाजुरी (९.२४ हेक्टर), टेकडी बंगला (४.१७ हेक्टर) आणि लोकमान्यनगर (६०.५१ हेक्टर) अशा एकूण २८७.५० हेक्टर क्षेत्रात हे सहा यूआरपी राबवण्यात येणार आहेत. यामध्ये एक लाख सात हजार बांधकामे असून सुमारे चार लाख ८५ हजार लाभार्थी आहेत.

टॅग्स :cidcoसिडको