शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षाच्या निवडीचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:51 IST

शासन निर्णयाचे काय? : निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश नाहीत

पंकज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी एक सदस्य पद्धतीने निवडणूक होणार, हे निश्चित झाले असले तरी अजूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत निवडणूक आयोगाचा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही. राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक नागरिकांमधून न घेता नगरसेवकांमधून घेण्याचे निश्चित केले असले, तरी ते आदेश निवडणूक आयोगामार्फत पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांची निवडणूक जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत संभ्रम कायम आहे.

राज्य शासनाने नगर परिषदेमधील नगरसेवकांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेतला आणि तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्यदेखील केला. २७ जानेवारीला हा आदेश काढण्यात आल्यानंतर त्यानुसार निवडणूक आयोगाने नवीन आदेश काढून आरक्षण सोडतही निश्चित केली.त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही नगर परिषदांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक आयोगामार्फत अद्याप आलेला नाही.

राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेत नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय निवडणूक आयोगाने स्वीकारणे आणि त्यांच्यामार्फत नगर परिषदेला निर्देश जाणे, हे अद्याप निश्चित केलेले नाही.शासनाचा नवीन आदेश निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत आहे. त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने नगरसेवकांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्य करून आगामी निवडणुकीसाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. योग्यवेळी निर्णय झाला नाही तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.

च्नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यात बदल करून महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पुन्हा नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेतला.च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रि येचा निर्णय कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.च्निवडणूक आयोगाने राज्य शासनाचा निर्णय मान्य न केल्यास अंबरनाथ आणि बदलापूरची निवडणूक ही थेट जनतेतून होण्याची शक्यता आहे.च्आयोगाने वेळेत राज्य शासनाचे निर्णय स्वीकारल्यास नगराध्यक्षाची निवड ही नगरसेवकांमधून होईल.च्मात्र, निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम कायम असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.