शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

चित्रातलं गावसौंदर्य!

By admin | Updated: February 5, 2017 03:08 IST

दीपक पाटील यांनी आपल्या रंगजाणिवेतून ग्रामीण जीवन हुबेहूब साकारले असून, रंगमाध्यमाचा एक जिवंत आविष्कार त्यांनी कॅनव्हासवर साकारला आहे. या कलाकृतीने ग्रामीण

- महेंद्र सुके दीपक पाटील यांनी आपल्या रंगजाणिवेतून ग्रामीण जीवन हुबेहूब साकारले असून, रंगमाध्यमाचा एक जिवंत आविष्कार त्यांनी कॅनव्हासवर साकारला आहे. या कलाकृतीने ग्रामीण जीवनाचे सौंदर्य आखीवरेखीव पद्धतीने चितारले असून, आजवर अनेक प्रदर्शनात ही चित्रे बघून रसिक अवाक झाले आहेत. दीपक पाटील यांचा जन्म धुळे जिल्हयातील कापडणे या गावात झाला असून, बालपणही तिथेच गेलÞे. आज शहरात आढळणारी समृद्धी, चैनवादी संस्कृती त्या छोट्या गावात नव्हती, पण निसर्गाची व नाते-संबधाची व कौटुंबिक जिव्हाळ्याची, हिरव्यागार शेताची व विविध ़ऋतुत येणाऱ्या फळांची फुलांची श्रीमंती त्यांनी पाहिली होती. अंधारात देवापुढे दिवा लावणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर पडलेला निरांजनाचा प्रकाश त्यांच्या अंतर्मनात घर करणारा ठरला होता. रोज सकाळी घरासमोर सडा टाकताना व नंतर रेखाटलेली रांगोळी रंगलेखकाच्या अनुभवांची समृद्धता आहे. या प्रदर्शनातील चित्रकलाकृती म्हणजे याच अनुभवविश्वाला कलावंताच्या अंतर्मनाने टिपलेला हा अविस्मरणीय असा देखणा कोलाज आहे. ग्रामीण जीवनात त्यांनी अनुभवलेली समृद्धता कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर साकारली आणि ती कलारसिकांना दाद मागणारी ठरली आहे. दीपक पाटील यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन चित्रकलेचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुढील शिक्षण पुण्यात घेतले. नोकरीसाठी मुंबईजवळच्या खोपोली येथे कला महाविद्यालयात रूजू झाले व कालांतराने त्याच ठिकाणी प्राचार्य झाले. याच कालावधीमध्ये त्यांची चित्रनिर्मितीही सुरूच होतीÞ. राज्यातील प्रदर्शनासाठी चित्रे तयार करून पाठवणे, सहकलाकार मित्रांसोबत विविध कला दालनात प्रदर्शन भरवणे सुरू असताना त्यांची २०१०साली मुंबई येथील जगप्रसिद्धजहांगीर कलादालनात त्यांना पहिल्यांदा एकल प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली आणि जाणकार रसिकांनी त्यांच्या कलाकृतीचा गौरव केला.त्या नंतरत्यांची चित्रे वेगवेगळ्या प्रदर्शनातून आपला वेगळा ठसा उमटवत गेली आणि ती जगप्रसिद्ध झाली. या चित्रांमध्ये आपल्या लाडक्या तान्हुल्याला झोका देऊन निजवणारी व त्याचवेळेस तिच्या थोरल्या मुलीशी हितगुज करणारी गृहिणी, भीतीदायक सापळ्याला पाहून त्यालाच घाबरवणारी मुले, खेळण्याच्या कपाटात लपून बसलेली मुलगी, स्वत:ला झाशीची राणी समजून आजोबांच्या पाठीवर बसून खेळणारी नात, आरशात बघुन कुंकू लावणारी गृहिणी, पाण्याच्या ओढीने झऱ्यात पाय टाकुन बसलेली तरुणी, मनातला आनंद चेहऱ्यावर आणत स्मितहास्य करणारी स्त्री, सोन्यासारख्या पिकाची कापणी करण्यात रमलेले कुटुंब, उदरनिर्वाहासाठी आपला संपूर्ण संसारच सोबत घेऊन भटकंती करत असलेले धनगर, देवापुढे शांतपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करणारी गृहिणी, हातातल्या सुपात समृद्धीरूपी धान्य घेऊन दारात उभी असलेली गृहिणी, प्रतीक्षा संपवून परतत असलेल्या सौभाग्याचे आनंदाने स्वागत करणारी गृहिणी, वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतातून घराकडे जाणाऱ्या बैलगाड्या, सकाळच्या वेळी देवाच्या दारातून देवपूजा आटपून बाहेर पडणारी स्त्री, पहाटेच्या वेळी मनोभावे पूजा करणारी मुलगी, माहेरी आलेल्या मुलीचा प्रेमाने साजशृंगार करणारी आई अशी असंख्य ग्रामीण सौंदर्यांने अलंकृत झालेली चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, प्रसिद्ध रंगलेखक दीपक पाटील यांनी अलीकडच्या काळात रेखाटलेल्या वास्तववादी चित्रांचे प्रदर्शन ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असणाऱ्या टाऊन हॉलमध्ये ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणारे हे प्रदर्शन कलारसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नि:शुल्क बघता येईल.