शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील चिक्कीची एफडीएकडून होणार तपासणी

By admin | Updated: July 13, 2015 03:19 IST

महापालिका शाळेच्या मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्कीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून

सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिका शाळेच्या मुलांना देण्यात येणाऱ्या चिक्कीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून मुलांच्या पटसंख्येनुसार लेखाजोखा घेऊन दरमहा चिक्कीचे बिल काढण्याचा आदेशही काढला आहे. आयुक्तांच्या आदेशाने ठेकेदाराचे धाबे दणाणले असून चिक्की घोटाळा बाहेर येणार आहे. उल्हासनगर पालिका शिक्षण मंडळ नोकर भरतीसह शिक्षक जिल्हानिहाय बदली तसेच साहित्य खरेदी प्रकरणात वादात सापडली आहे. या प्रकाराने मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. मंडळ वादात सापडल्याने कोणताही अधिकारी येथे येण्यास धजावत नसून गेल्या दोन वर्षांपासून मंडळाचा कारभार कनिष्ठ कर्मचारी व प्रभारी प्रशासन अधिकारी हाकत असल्याने सावळागोंधळ निर्माण झाला आहे.महापाालिकेच्या बहुतेक शाळा इमारती धोकादायक झाल्या असून या वर्षी ६ कोटींच्या निधीतून तीन शाळेच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. मात्र, निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने शाळा इमारतीचा प्रश्न कायम आहे. ७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी धोकादायक इमारतीखाली जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा इमारती बांधण्याऐवजी शिक्षण मंडळ गेल्या दोन वर्षांपासून शासनाचा पोषण आहार असताना २ कोटींची चिक्की देत आहे. एकंदरीत पालिका शिक्षण मंडळ घोटाळ्यात सापडले असून तीन वर्षांपूर्वी १८ लाखांचा खर्च सहलीवर दाखविण्यात आला होता. प्रत्यक्षात मुलांची सहल शेजारी रिसॉर्टमध्ये गेली होती. ती चौकशीही धूळखात पडली आहे. शासनाचा शालेय पोषण आहार मुलांना दिला जात असताना २ कोटींची चिक्की देणे कितपत योग्य? हे चोचले कशासाठी, अशी टीकाही होत आहे.