शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचघरला प्रश्नपत्रिका २ तास उशिरा

By admin | Updated: March 17, 2017 05:47 IST

तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि.पाटील विद्यालयात दहावी परिक्षेचे केंद्र असून आज भूमितीचा पेपर होता. मात्र परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल दोन तास

वाडा : तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि.पाटील विद्यालयात दहावी परिक्षेचे केंद्र असून आज भूमितीचा पेपर होता. मात्र परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थांना ताटकळत बसावे लागले. या यामुळे पालक चांगलेच संतापले असून याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुरूवारी भूमितीचा दोन तासांचा पेपर होता. तालुक्यातील सर्व केंद्रांच्या प्रश्नपत्रिका वाडा कस्टडीमध्ये जाऊन घेतल्या जातात. चिंचघर येथे ह.वि.पाटील विद्यालयात सहा शाळांचे ८२३ विद्यार्थी या विषयाची परीक्षा देत आहेत. पैकी १२९ विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे तर २११ विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमाचे आहेत. आज सकाळी या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यावर लिलाफे उघडले असता इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्या नसल्याचे केंद्र प्रमुखांच्या लक्षात आले. त्यानंतर चिंचघर येथील शिक्षण संस्थेचे सदस्य श्रीकांत भोईर व नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी तातडीने लक्ष घालून केंद्र प्रमुखांकडे चौकशी केली असता ही चूक बोर्डाकडून झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर केंद्र प्रमुखांसह सर्वांनी धावाधाव केली असता बोर्डाकडून एक प्रश्नपत्रिका आॅनलाईन देण्यात आली. त्यानंतर तिच्या एका खासगी दुकानात झेरॉक्स काढून नंतर विद्यार्थांना त्या दोन तास उशिराने देण्यात आल्या. दुपारी १ ते ३ असा वेळ देऊन पेपर सोडविण्यात आले. परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थांना अडीच तास ताटकळत बसावे लागले. दरम्यान, बोर्डाच्या गलथान कारभाराचा निषेध श्रमजीवी संघटनेचे सहसरचिटणीस विजय जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, रोहन जाधव, भालचंद्र कासार यांनी केला. विद्यार्थांना शाळेकडून बिस्किटे व पाणी देण्यात आले. परीक्षा बोर्डाचे विभागीय सचिव चांदेकर यांच्याशी दूरध्वनी करून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर आम्ही वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडू शकत नाही. त्यामुळे ही चूक आधी लक्षात आली नाही. अशी माहिती कस्टोडीयन विलास शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)