शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने सफाळेत चिमुरडीचा मृत्यू?

By admin | Updated: November 14, 2015 01:57 IST

सफाळे (माकणे) येथील सेजल राजु घरत या ९ वर्षीय मुलीला अन्नातुन विषबाधा झाल्याने सफाळे येथीलच डॉ. गोखले यांच्या समृद्धी क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले.

पालघर : सफाळे (माकणे) येथील सेजल राजु घरत या ९ वर्षीय मुलीला अन्नातुन विषबाधा झाल्याने सफाळे येथीलच डॉ. गोखले यांच्या समृद्धी क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी डॉक्टर वेळीच उपस्थित न झाल्याने तिचा मत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांसह उपस्थित जमावाने करीत मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण तंग बनले होते.माकणे येथील सेजल हिने बुधवारी रात्री घरीच तयार केलेले खाडीतील माशाचे कालवण खाल्ले. मात्र, तिच्या पोटात मळमळ सुरू होऊन तिला उलट्या सुरू झाल्या. घरातील लोकांनी तिच्यावर घरगुती उपाययोजना केली. पहाटे पुन्हा तिला उलट्या सुरू झाल्याने गुरुवारी उपचारासाठी सफाळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यावेळी उपस्थित डॉ. रणदिवे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे टोलफ्री क्र. १०८ वर फोन करून अ‍ॅम्ब्युलन्सही मागविल्याचे डॉ. रणदिवेंनी सांगितले. दरम्यानच्या काळात एका नातेवाईकानी सफाळे येथीलच समृद्ध क्लिनीक चे डॉक्टर संजय गोखले यांच्याकडे सेजलला उपचारासाठी नेले. त्यावेळी डॉ. गोखले यांना क्लिनीकमध्ये येण्यास थोडा उशीर झाल्याने उपचाराअभावी सेजलचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांसह मोठा जमाव डॉ. गोखलेंच्या क्लिनीकमध्ये जमा होऊ लागला. क्लिनीकमधील साहित्याचीही उपस्थित जमावाने तोडफोड करीत डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत उपस्थितांशी चर्चा केली. या प्रकरणात दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याचा रिपोर्ट आल्यानंतर सेजलच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे बजबळे यांनी सांगितल्यानंतर जमावाची पांगापांगा झाली. या संदर्भात डॉ. रणदिवे यांच्याशी संपर्क साधला असता सेजलने खाल्लेले मासे हे रासायनिक मिश्रीत दुषीत मासे होते की काय याचा शोध घेण्याबरोबरच उलटीनंतर तिच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तीने प्रथमोपचाराला योग्य प्रतिसाद न दिल्याने रूग्णाला पालघरच्या ग्रामीण रूग्णालयातील तज डॉक्टरांकडे नेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले. सध्या सफाळे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे सफाळे पोलीसांनी सांगितले. (वार्ताहर)