शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मुलांची आवड त्यांच्या लेखनाद्वारे ठरवावी

By admin | Updated: February 6, 2017 04:15 IST

मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे.

मुरलीधर भवार, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे. आजच्या बालसाहित्याने चांगली आणि हुशार मुले निर्माण केली, तर ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले’ हा प्रश्न उपस्थित होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालकुमार साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांनी येथे केले.साहित्य संमेलनातील ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले?’ हा परिसंवाद शं.ना. नवरे सभामंडपात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. जोशी अध्यक्षस्थानी होते. जोशी म्हणाले की, बालसाहित्याचा केंद्रबिंदू मुले आहेत. त्याच्या त्रिज्या आणि व्यास हे लेखक आहेत. मुलांचे साहित्य म्हणजे बडबडगीते, अशी अनेकांची धारणा आहे. बडबडगीते म्हणजे बालसाहित्य नाही. ही समजूत बालसाहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांनी मनातून काढून टाकावी. तरच, वस्तुनिष्ठ बालसाहित्य लेखन केले जाऊ शकते. मुलांची कल्पनाशक्ती विलक्षण असते. तिला वळण लावण्याचे काम बालसाहित्यिकांनी केले पाहिजे. याकडे जोशी यांनी लक्ष वेधले. बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी सांगितले की, बालसाहित्य आणि बालशिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बालसाहित्य हे बालकांच्या भवितव्याशी निगडित बाब असल्याने त्यावर गंभीर स्वरूपात चर्चा व्हायला हवी. ती होताना दिसून येत नाही. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे. बालसाहित्यातून मुलांचे आत्मभाव व भाव जागा होतो. बालसाहित्य हे उपेक्षित आहे. त्याला महत्त्वाचा प्रवाह मानले जात नाही. बोबडे बोल लिहिणे म्हणजे बालकविता होत नाही. मुलांना हल्ली संगणकाचा आणि टीव्हीचा पडदा आवडतो. त्यांच्या चुकीच्या प्रवृत्ती उफाळून येतील. त्यांच्या बालमनाची भूक भागवणारे बालसाहित्य लिहिले पाहिजे.बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणाले की, मुलांचे साहित्य अनुकरणाच्या जंजाळात अडकून पडले, तर मुलांचे जग आणि भाषा समजून घेण्यास आपण कमी पडू. बालसाहित्य पाहिजे त्या प्रमाणात गुणात्मकदृष्ट्या वाढीस लागलेले नसून, ते संख्यात्मकदृष्ट्या वाढील लागले आहे. ते गुणात्मकदृष्ट्या वाढीला लागले पाहिजे. बालसाहित्याला एक प्रकारचे साचलेपण आले आहे. ते दूर झाले, तर बालसाहित्याला चांगले दिवस येतील. बालसाहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी सांगितले की, पालकांनी मुलांना चांगल्या बालमासिकांच्या वाचनाची सवय लावली पाहिजे. ही जबाबदारी एकट्या लेखकाची नाही. मनोरंजन व प्रबोधनासह बालसाहित्याने ज्ञानार्जनाचेही काम केले पाहिजे. बालसाहित्याला वाचनाश्रय, राजाश्रय आणि समीक्षाश्रय मिळत नाही. तो मिळाला तर बालसाहित्याला नक्कीच चांगले दिवस येतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरेश साने यांनी केले.