शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

मुले परदेशात असल्याने स्नेहींनी केले वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:32 IST

कोरोनामुळे झाला होता मृत्यू

ठळक मुद्देकल्याण पश्चिमेतील गांधी चौकात राहणाऱ्या उषाबेन पटेल यांना कोरोनाची लागण झाली. ७० वर्षांच्या उषाबेन यांना कल्याणच्या खाजगी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : तिचे वय वर्षे ७०. तिला कोरोनाची बाधा झाली होती. तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली होती. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, कारण तिची तिन्ही मुले परदेशात आणि पती कोरानाग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध असलेल्या दोन भावांनी जिवाची पर्वा न करता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे कर्तव्य बजावले. 

कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात राहणाऱ्या उषाबेन पटेल यांना कोरोनाची लागण झाली. ७० वर्षांच्या उषाबेन यांना कल्याणच्या खाजगी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे पती रमणभाई हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना घरातच आयसोलेट करण्यात आले. कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उषाबेन यांचा उपचारादरम्यान १२ दिवसांनी १४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार कोण, असा प्रश्न होता. कारण त्यांची एक मुलगी वंदना आफ्रिकेत, तर एक मुलगा अमित आणि मुलगी अस्मिता हे दोघे लंडनमध्ये होते. कोरोना झालेले रमणभाई घराबाहेर कसे पडणार? त्यातही त्यांचे वय ७३ वर्षे. अशा परिस्थितीत उषाबेन यांच्या कुटुंबाशी गेल्या तीन पिढ्या ऋणानुबंध असलेले कल्याणमधील विनोद पटेल आणि योगेश पटेल यांच्याशी त्यांच्या तिन्ही मुलांनी परदेशातून संपर्क साधला. विनोद व योगेश या पटेल बंधूंना उषाबेनवर अंत्यसंस्कार तुम्हीच करा, आम्ही इतक्या कमी वेळेत तातडीने येऊ शकत नाही. फोन येताच पहाटे दोन वाजता उषाबेन यांचा मृतदेह घेण्यासाठी विनोद व योगेश पोहोचले. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात माजी नगरसेवक अरुण गीध यांनी प्रयत्न केला. त्यानंतर सकाळी उषाबेन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर लाल चौकी येथील स्शमानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

उषाबेन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावरील अंत्यसंस्काराला मुले नव्हती. पती रमणभाई यांनाही पत्नीवर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. उषाबेन गेल्यावर आता रमणबाई कोरोनातून बरे झाले आहे. त्यांची लंडन येथे वास्तव्याला असलेली मुलगी अस्मिता कल्याणच्या घरी परतली आहे. आता ती रमणभाई यांची काळजी घेत आहे. 

टॅग्स :thaneठाणेAmericaअमेरिका