शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईसाठी जुंपले बालमजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:32 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात चक्क बालमजुरांसह वृध्द नागरिकांना जुंपण्यात आले आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात चक्क बालमजुरांसह वृध्द नागरिकांना जुंपण्यात आले आहे. गेल्या वर्षीदेखील बालमजुरांना नालेसफाईसाठी राबवण्यात आले होते. हे बालकामगार, अन्य मजुरांकडे काम करताना आवश्यक सुरक्षाविषयक साहित्य नसल्याने त्यांच्या जीवितास तसेच आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.मीरा-भार्इंदरच्या पावसाळापूर्व नालेसफाईचे कंत्राट आशापुरा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. दरवर्षी हीच कंपनी नालेसफाईचे काम करते. सध्या शहरांतर्गत गटारांच्या सफाईचे काम सुरु असून भार्इंदर पश्चिम आणि पूर्व भागात या कामाला अल्पवयीन मुला-मुलींना जुंपल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यासह काही वयोवृध्दही नालेसफाई करताना दिसत आहेत. पण यातील कोणाकडेही गमबूट, हातमोजे, मास्क आदी सुरक्षा साहित्य दिसत नाही.अनेकदा बंदिस्त नाल्यात घातक वायू असतात. शिवाय आत प्रचंड दुर्गंधीयुक्त गाळ, सांडपाणी तसेच काचेचे तुकडे, पत्रा, दगड आदी असतात. त्यामुळे सुरक्षाविषयक साहित्याविना नालेसफाईचे काम प्रसंगी जीवावर बेतू शकते. आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी गणेश निंबाळकर नावाचा कामगार नालेसफाईदरम्यान गुदमरुन बुडून मरण पावला होता. या कामासाठी मजुरांची मोठी चणचण असल्याने जसे मिळतील तसे मजूर गोळा करून आणले जातात. त्यांना आवश्यक सुरक्षाविषयक साहित्य पुरवण्याची जबाबदारी, त्याच्या जीविताची जबाबदारी पालिका आणि ठेकेदाराची असते. या कामात बालकामगारांना राबवण्यास मनाई आहे.>प्रशिक्षणाचा अभावमहत्वाचे म्हणजे नालेसफाई करताना काय काळजी आणि खबरदारी घ्यावी, नालेसफाई कशी करावी, आदींचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु अशी कोणतीच खबरदारी ठेकेदार किंवा महापालिका घेताना दिसत नाही.बालमजूर, वृध्दांना नालेसफाईला जुंपतानाच मजुरांना आवश्यक साधने- साहित्यही पुरवले जात नसल्याने या प्रकरणी ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.