शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कार्यालय विरोधकांच्या रडारवर

By admin | Updated: July 11, 2015 03:22 IST

मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट मिळावे म्हणून महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ‘वाकड्या’ मार्गाने जाऊन खोट्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री कार्यालयातील

नारायण जाधव , ठाणेमर्जीतील ठेकेदाराला कंत्राट मिळावे म्हणून महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ‘वाकड्या’ मार्गाने जाऊन खोट्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांची ‘मनीषा’ पूर्ण करून १५० ते २०० कोटींचा जलवाहिन्यांचा ‘तो’ प्रस्ताव सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर करून घेतला असल्याचे खास सूत्रांनी सांगितले. स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून एमआयडीसी सोबत करारनामा नसतानाही १०० एमएलडी पाणी आणण्याकरिता जलवाहिनीचा प्रस्ताव या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयास सादर केला. असे करताना जलवाहिनी टाकण्यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूद नसताना अन् राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वनविभाग, सीआरझेडच्या आवश्यक परवानग्यांसह जमीन संपादित नसतानाही या सर्व परवानग्या आहेत, असे भासविले. याकरिता नगरविकास विभागातील काही अधिकाऱ्यांच्या ‘मनीषा’ पूर्ण केल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने खातरजमा न करताच त्या प्रस्तावास मंजुरी दिली. नंतर या कंत्राटाचे सहा तुकडे करून निविदा मागविल्या आहेत़