शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘मुख्यमंत्री रोजगार योजना’ जिल्ह्यात लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:24 IST

प्रशिक्षणाची सोय : सरकार देणार अनुदान

ठाणे : उद्योग, व्यवसायांमध्ये व्यापक गुंतवणूक होत असल्यामुळे सूक्ष्म लघुउद्योजकांसाठी पूरक उद्योग व्यवसायाच्या संधी ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी प्राप्त व्हाव्यात, यासाठी आता नव्याने ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजना’ ठाणे जिल्ह्यातदेखील राबवण्याचे निश्चित झाले आहे. या संधीचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वर्षाली बी. सोने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतीच्या उद्योगिक प्रगतीसाठी प्रथमच सुरू केलेल्या या योजनेद्वारे कृषी व कृषीवर आधारित उद्योग, उत्पादन व सेवा उद्योग आदी उद्योग प्रकल्पांसाठी संबंधितांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी १० लाख, उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख गुंतवणुकीचे प्रकल्प हाती घेणे शक्य होणार आहे.यासाठी शासनाकडून प्रकल्प मंजुरीच्या १५ ते ३५ टक्के आर्थिक साहाय्य हे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी जिल्ह्यातील युवक-युवतींना उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याची संधी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामोद्योग विभागाने उपलब्ध करून दिली आहे.५५० जणांना पहिल्या टप्प्यात मिळणार लाभच्नुकत्याच सुरू झालेल्या या योजनेद्वारे यंदा जिल्हा उद्योग केंद्राकडून ३२० युवक-युवतींची निवड करून उद्योग व्यवसायाची संधी दिली जाणार आहे. तर, ग्रामोद्योग केंद्रांकडून २३५युवक-युवतीची निवडकरण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.च्यासाठी लागणाऱ्या प्रोजेक्टसह प्रशिक्षण, बँकेकडून कर्जाची उपलब्धता आदींसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे.च्या संधीचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास , जातीचा दाखला, प्रशिक्षण सर्टिफिकेट, प्रोजेक्ट रिपोर्ट आदी कागदपत्रांची गरज आहे.च्याविषयीच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या ठाणे येथील एमआयडीसी आॅफिस बिल्डिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड चेकनाका येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :thaneठाणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस