शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुख्यमंत्री जिंकले, पालकमंत्र्यांनी फसवले

By admin | Updated: September 8, 2015 23:33 IST

त्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना राज्यशासनाने सोमवारी काढली. त्यामुळे त्या गावांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या संघर्ष समितीने मंगळवारी डोंबिवली

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीत्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना राज्यशासनाने सोमवारी काढली. त्यामुळे त्या गावांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या संघर्ष समितीने मंगळवारी डोंबिवली तसेच कल्याण ग्रामीणमध्ये दिवाळी साजरी केली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. तर पालकमंत्र्यांनी सपशेल फसवल्याची उघड टीकाही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच आगामी काळात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते नाही आले तरी, सर्व पक्षांची मिळून संघर्ष समिती उमेदवार उभे करणार असल्याचेही सांगण्यात आले. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी यासंदर्भात ‘लोकमत’ला ही माहिती दिली. शिंदे यांनी वेळ मारून नेली...१ जून रोजी या गावांना केडीएमसीत घेण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिशाभूल व चुकीची माहिती दिल्याने तो घेण्यात आला होता. त्यानंतर संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पालकमंत्र्यांसमवेत दोन वेळा बैठक झाली होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी त्या दोन्ही बैठकींदरम्यान बघतो... करतो... असे सांगून वेळ मारुन नेली.त्यामुळे तर समस्या वाढलीप्रत्यक्षात पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी बालेलेच नाहीत. त्यामुळे समस्या वाढली, त्यानंतर कल्याणचे आमदार नरेंद्र पवार ज्यांचा या परिसराशी संबंधही नाही, त्यांनी सर्व व्यथा, म्हणणे ऐकून घेतले. नंतर तेच मुख्यमंत्र्यांशी बोलले. एवढेच नव्हे तर त्यांनी ३० जुलै रोजी बैठकही लावली होती. त्यात सर्व सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही २७ गावे मनपात समावेश करण्यावचा निर्णय घाईत घेतला असून त्यात सुुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसारच हा निर्णय झाल्याचे गुलाब वझे म्हणाले. त्या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, चंद्रकात पाटील, अर्जून बुवा चौधरी, बळीराम चरे, उपाध्यक्ष, गणेश म्हात्रे, विजय भाने , तुळशीराम म्हात्रे, रमाकांत पाटील हे सेक्रेटरी, भगवान पाटील - खजिनदार, रंगनाथ ठाकुर, पांडुशील म्हात्रे, जालींदर पाटील, दत्ता वाझे, वासुदेव गायकवाड, रतन पाटील उपस्थित होते.उपमहापौर खासदारांच्या भेटीलास्थानिक भाजपाश्रेष्ठींवर नाराज असलेले शहराचे उपमहापौर राहुल दामले यांनी मंगळवारी संध्याकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. २७ गावांच्या विषयावरून स्थानिक भाजपा नेत्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या चपराकच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यात कोणतेही राजकारण नसून कॅप्टन विनयकुमार सच्चान स्थारकासाठी खासदार निधीस मिळण्यास विलंब होत असल्याने त्याच्या पाठपुराव्यासाठी आपण भेट घेतल्याचे दामलेंनी स्पष्ट केले.