शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनाच आश्वासनांचा विसर, भाजपासह मित्रपक्ष नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:04 IST

दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले.

सदानंद नाईक उल्हासनगर : दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा फक्त आश्वासन दिले आहे.महापालिकेवर भाजपासह मित्र पक्षाची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका निवडणुकीच्या दरम्यान शहर विकास आराखडा मंजुरीसह अनेक आश्वासने नागरिकांना दिली होती. भाजपाचे मित्रपक्ष साई व ओमी टीमने शहर विकास आराखडयासह इतर विकासात्मक पॅकेजबाबत महापौर आयलानी यांच्याकडे तगादा लावला. तसेच आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याची टीका शहरातून सुरू झाली आहे.महापौर आयलानी व पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्र्याची सहा महिन्यात तीनवेळा भेट घेतली. तसेच त्यांच्या समोर निवडणुकीतील आश्वासनांचा पाढा वाचून शहर विकास आराखडयासह वाढीवपाणी योजना, विशेष पॅकेज, रस्ता रूंदीकरणातील बाधित व्यापाºयांचे पुनर्वसन, नगररचनाकार आदी अनेक प्रस्तावांना लवकरच मंजुरी देण्याची विनंती केली. गेल्याच महिन्यात नगरविकास विभागाच्या सचिवांकडे बैठक घेऊन शहरातील विविध समस्या मांडल्या. त्यानींही उत्साहाच्या भरात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री शहर विकास आराखडयाला मंजुरी देणार असल्याचे सांगितले.दिवाळी संपल्यानंतरही आराखडयाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली नाही. याप्रकाराने महापौरांसह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.मात्र नाराजी कोणीही उघडपणे व्यक्त करत नसल्याने, भाजप मित्रपक्षात असंतोष खदखदतो आहे. शुक्रवारी महापौर, कुमार आयलानी यांनी दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याभेटीत त्यांनी पुन्हा जुन्या मागण्यांची आठवण करून दिली. एका महिन्यात शहर विकास आराखडयासह इतर प्रस्तावांना मंजुरी देणार असल्याचे आश्वासन महापौरांना दिले.>...तर भाजपाला धक्कापक्षात अशीच नाराजी निर्माण झाल्यास भाजपाला झटका बसणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पक्षातील निष्ठावंत गटही शहर विकास ठप्प पडल्याने नाराज आहे. एकूणच वरिष्ठांच्या आश्वासनपूर्ती अभावी शहर भाजपासह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर