शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाची निवडणूक : बदलापूरच्या नगरसेवकांना पंचतारांकित पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:05 IST

नगराध्यक्षपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

बदलापूर : नगराध्यक्षपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. हे सर्व नगरसेवक मुंबईच्या जे.डब्ल्यू. मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.नगराध्यक्षपदावरून ज्या वेगाने बदलापूरमध्ये हालचाली सुरू झाल्या, त्याच वेगाने या ठिकाणी असलेले मतभेदही शमल्याचे दिसत आहे. राऊत विरुद्ध म्हात्रे असे चित्र बदलापूरमध्ये रंगवण्यात आले होते. मात्र, नगराध्यक्ष म्हात्रे यांनीच पुढाकार घेत राऊत यांना उमेदवारी देण्यात आपली कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्ट करत राऊत यांना समर्थनही दिले.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांची नावे कळवण्यात आली होती. त्यानुसार, विजया राऊत यांना पहिले सव्वा वर्ष नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या निर्णयाला सर्व नगरसेवकांनी समर्थनही दर्शवले आहे. पुढील सव्वा वर्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नगरसेवकांनीच एकत्रित निर्णय घेत अंतर्गत वाद मिटवल्याने भाजपाची चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनेच्या फुटीर गटाला सोबत घेऊन सत्तेची गणिते आखण्याचा प्रयत्न भाजपा करत होते. मात्र, शिवसेनेने भाजपाचे मनसुबे ओळखले असून पक्षात वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करून सर्व वादांवर पडदा टाकला आहे.निवडणुकीचे वातावरण पाहता उमेदवारी अर्ज भरताना कोणता घोळ होऊ नये, यासाठी शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना एकत्रित ठेवत अज्ञातस्थळी रवाना केले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे सर्व नगरसेवक जुहूच्या जे.डब्लू. मॅरिएट हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. या ठिकाणी सर्व नगरसेवकांना एकत्रित ठेवत शनिवारी दुपारी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शिवसेना एकसंध झाल्याने बदलापूरची नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक