शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी मोठे की मत्स्य सहआयुक्त? मासेमारी आदेश-खुलाशावरून संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 23:59 IST

Palghar : जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ आदेशातील ठळक बाबी जाहीर करताना अत्यावश्यक बाबीमध्ये  लाखो कुटुंबांच्या उत्पन्नाच्या मासेमारी व्यवसायाबाबत कुठलाही स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता.

पालघर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशात मासेमारी, मासे खरेदी आणि मासे विक्री ही बाब अत्यावश्यक सेवेमध्ये नमूद करण्यात आली नसताना मत्स्य व्यवसाय सहआयुक्त आनंद पालव यांनी मात्र अ.भा. मांगेला समाज परिषदेचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांना मासेमारी, खरेदी-विक्री ही अत्यावश्यक बाब  असल्याचा खुलासा केल्याने जिल्हाधिकारी मोठे की सहआयुक्त? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ आदेशातील ठळक बाबी जाहीर करताना अत्यावश्यक बाबीमध्ये  लाखो कुटुंबांच्या उत्पन्नाच्या मासेमारी व्यवसायाबाबत कुठलाही स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे मासेमारी, विक्री आणि वाहतुकीबाबत नेमके आदेश काय? याबाबत मच्छीमारांमध्ये संभ्रम होता. यामुळे सोमवारी अध्यक्ष देवेंद्र तांडेल, जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, युवाध्यक्ष पुनित तांडेल, युवाध्यक्ष भावेश तामोरे, युवा सचिव दीपेश तामोरे आदींच्या शिष्टमंडळाने सहआयुक्त पालव यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सहआयुक्तांनी चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी व मासळी दुकानांचा उल्लेख अत्यावश्यक सेवेत केल्याचे समितीला सांगितले. याबाबत सहआयुक्त आनंद पालव यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आदेशात उल्लेख नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात मासे विक्रीबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळावेत की, सहआयुक्त आनंद पालव यांनी शासन आदेशाच्या प्रतीचा आधार घेत मासेमारी, विक्री, वाहतूक याला परवानगी असल्याचे शिष्टमंडळाला सांगितल्याने त्यांचे आदेश पाळावेत? असा प्रश्न मच्छीमारांपुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :palgharपालघर