शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा शाळेतील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या चिक्क्यांमध्ये आळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दिल्या जाणाऱ्या चिक्क्यांमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दिल्या जाणाऱ्या चिक्क्यांमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या चिक्क्यांचा पुरवठा करणाऱ्या गुन्हा दाखल करून त्याची सर्व देयके थांबविण्याची मागणी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसने केली.

ठाण्यात महापालिकेच्या २०० हून अधिक शाळा असून, त्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दररोज चिक्क्या दिला जात होत्या. कोविड काळात शाळा बंद असल्याने त्याचा पुरवठा बंद झाला होता. यावेळी राजकीय हस्तक्षेप करून या चिक्क्यांचा आठवड्यातून एकदा पुरवठा करण्याचा निर्णय ठामपाच्या शिक्षण मंडळाने घेतला होता.

ठामपाच्या बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक ॲड. विक्रांत चव्हाण यांनी याबाबत विषय मांडला होता. हे कंत्राट बेकायदा दिले असून, अटी-शर्तीनुसार दिलेला नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. हा कारखानाही ठाण्याऐवजी सोलापूरमध्ये आहे. ठाण्यातील एका बेकायदा बंगल्यावर या चिक्क्यांचा सर्व साठा ठेवण्यात येतो. या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे.

या कंत्राटदाराला ठिकठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवास शुल्क दिले जात आहे. तेही बेकायदा असल्याची बाबही उघडकीस आली आहे. या चिक्क्यामध्ये आता चक्क अळ्या आढळल्या आहेत. याबाबत आयुक्तांची भेट घेऊन या कंत्राटदारावर त्वरित गुन्हा नोंदवावा आणि त्याची देयके त्वरित रोखण्याची मागणी करणार असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

-----------------