शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

मेणाच्या घरातील चिऊताईला अखेर मिळाले हक्काचे घर

By admin | Updated: March 14, 2017 01:37 IST

वाढती वृक्षतोड, वाढते नागरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण, मोबाइल टॉवर यामुळे चिमण्यांचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. घरातील आरश्यासमोर, इमारतीतील

जान्हवी मोर्ये , डोंबिवलीवाढती वृक्षतोड, वाढते नागरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण, मोबाइल टॉवर यामुळे चिमण्यांचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. घरातील आरश्यासमोर, इमारतीतील अडगळ, जिने, गॅलरी, दुकानांच्या शटरवर घरटे करून राहणाऱ्या चिऊताईचा चिवचिवाट बंद झाला. चिऊताई यापुढे नवीन पिढीला पुस्तकातून आणि चित्र रूपाने सांगण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. हेच गृहीत धरून डोंबिवलीतील क्रीडासंकुलातील एका कोपऱ्यात ‘तिच्या’साठी हक्काचे चिऊ पार्क साकारले जात आहे.‘रोटरी क्लब आॅफ डोंबिवली पश्चिम’ हे पार्क उभारत आहे. पक्षप्रेमी व रोटरीचे माजी अध्यक्ष राजीव मोहिते यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मोहिते दीड वर्षापासून हे पार्क उभारण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, त्यांना जागा मिळत नव्हती. महापालिकेने त्यांना क्रीडासंकुलातील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाशेजारील उद्यानातील जागा देऊ केली. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. चिऊ पार्कच्या कामाचा प्रारंभ ३० जून २०१६ ला महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तत्कालीन सभागृह नेते राजेश मोरे यांच्या उपस्थित झाला. चिमणी पार्क आता हळूहळू आकार घेत आहे. त्याच्या उभारणीवर आतापर्यंत १० लाखांचा खर्च झाला आहे. हे पार्क पूर्ण होण्यासाठी किमान ६० लाखांचा आणखी खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी मोहिते यांना मदतीची अपेक्षा आहे. मोहिते हे अध्यक्ष असताना त्यांनी चिमण्यांसाठी घरटी जमवण्यास सुरुवात केली. पक्षीप्रेमी दीपक काळे यांनी त्यांना चिमणी वाचवाचा उपक्रम हाती घेण्याची सूचना केली. त्यानुसार ते कामाला लागले. चिऊ पार्कमध्ये फॅब्रिक मेटालिक एमएस धातूपासून एक मोठा डोम तयार करण्यात आला आहे. त्यात २०० पेक्षा जास्त जातींची झाडे लावली जाणार आहेत. त्यावर चिमण्या घरटी बनवू शकतील. डोमला चौकोनी जाळीआहे. केवळ चिमणी आतमध्ये जाऊ शकेल इतक्याच आकाराचे हे चौकोन आहेत. त्यामुळे अन्य पक्षी चिमणीला त्रास देणार नाही. ते डोममध्ये जाऊन त्यांची अंडी खाऊ शकणार नाहीत, अशी काळजी डोम बनवताना घेण्यात आली आहे. पार्कमधील झाडांना लाकडी घरटी बांधली आहेत. खाद्यांसाठी फिडर तर पाण्यासाठी फिलर तयार केले आहेत. झाडांना येणाऱ्या फुलाचे कोंब, मध खाण्यात चिमण्यांना रस असतो. त्यामुळे डोममध्ये तशी झाडे लावली आहेत. झाडाच्या मुळापाशी अननसाचा चोथा त्यांना खाण्यासाठी टाकला जातो. ज्वारी, बाजरीच्या लोंब्याही तेथे उगवल्या जातील. चिमणी पार्कमध्ये सनबर्ड, शिंपी, टेलरबर्ड या पक्षांबरोबर खारू ताईचा संसारही फुलला आहे. या पार्कमध्ये चिमण्यांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे मुलांच्या सहली आल्या तरी त्यांना गटागटाने पार्कमध्ये सोडले जाईल. पण त्यांना घरट्यांजवळ जाता येणार नाही. त्याऐवजी दूरवरून दुर्बिणीने त्यांना चिमण्या पाहता येतील.