शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण यांना दोन्ही प्रकरणात जामीन

By admin | Updated: January 11, 2017 07:24 IST

अंबरनाथ नगपरिषदेचे सहाय्यक नगररचनाकार विद्यासागर चव्हाण यांना बलात्कार प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगपरिषदेचे सहाय्यक नगररचनाकार विद्यासागर चव्हाण यांना बलात्कार प्रकरणात ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर अंबरनाथ पालिकेतील लाच प्रकरणात देखील त्यांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सलग दोन्ही प्रकरणात चव्हाण यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या नोकरीवर येणारे संकट टळले आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यासाठी मुंबईच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. चव्हाण यांनी लाचेची रक्कम घेतल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र रंगेहाथ न पकडल्याने चव्हाण यांनी या प्रकरणात आपल्याला गोवण्यात येत असल्याचे कारण पुढे करून न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविला होता. मात्र हा जामिन रद्द करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. हे प्रकरण सुरु असतांनाच पुन्हा चव्हाण यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करित बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. लाच प्रकरणात चव्हाण यांना गोवण्याचा प्रयत्न फसल्याने पुन्हा आपल्याला नवीन प्रकरणात गोवल्याचा दावा करित त्यांनी पुन्हा अंतरिम जामिन मिळविला होता. दोन्ही प्रकरणात अंतरिम जामिनावर असलेल्या चव्हाण यांनी या प्रकरणात कायमस्वरुपी जामिनासाठी अर्ज केला. ५ जानेवारीला कल्याण न्यायालयात लाच प्रकरणात चव्हाण यांना न्यायालयाने जामिन मंजूर केला. तर बलात्कार प्रकरणात ठाणे न्यायालयाने देखील त्यांना जामीन मिळाला आहे. चव्हाण तुरी देऊन निसटल्याने हे प्रकरण चर्चेत होते. शिवाय त्यांच्या लाच प्रकरणानंतर पालिकेत फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. (प्रतिनिधी)