शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

डीजेच्या जमान्यात ढोलताशा टिकवण्याचे मोठे आव्हान- छत्रपती संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:00 IST

डोंबिवलीत झालेल्या राज्यस्तरीय तालसंग्राम ढोलताशा स्पर्धेत ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ या पथकाची बाजी

डोंबिवली : ढोलताशा ही पारंपरिक वाद्ये संस्कृतीचा भाग आहेत. डीजेच्या दणदणाटात ही वाद्यसंस्कृती टिकवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. अनेक पारंपरिक खेळही लुप्त होत आहेत. हा सर्व सांस्कृतिक ठेवा जपायचा असल्यास विविध ठिकाणी ढोलताशा पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके करणारे संघ तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘तालसंग्राम’सारख्या स्पर्धा भरवून प्रात्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या किल्ले संवर्धन समितीचा अध्यक्ष म्हणून त्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिले. स्पर्धेत ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ या पथकाने बाजी मारली.आरंभ प्रतिष्ठानतर्फे झालेल्या तालसंग्राम २०१९ या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेला रविवारी संभाजी राजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी किल्ले संवर्धनाचे महत्त्व, गरज आणि व्याप्ती विशद करताना पारंपरिक वाद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आयोजकांनी केलेला प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगितले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष निशांत चव्हाण, स्पर्धेचे प्रमुख सल्लागार अनिकेत घमंडी, यज्ञेश पाटील, श्रीकांत घोगरे, हृषीकेश पाठक आदींसह आरंभ प्रतिष्ठानतर्फे संभाजी राजे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.राज्यभरातून या स्पर्धेत एकूण १६ पथके सहभागी झाली होती. त्यामध्ये ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ (डोंबिवली) पथकाने प्रथम क्रमांक, तर ‘कालभैरव’ (रत्नागिरी) द्वितीय, शिवस्वरूप’ने (भिवंडी) तिसरे पारितोषिक पटकावले. तसेच उत्कृष्ट ढोलवादक म्हणून लतिका मोरे, उत्कृष्ट ताशावादक सिद्धेश पटारे, उत्कृष्ट टोलवादक एॅलवोन फर्नांडिस, तर उत्कृष्ट ध्वजधारी म्हणून मधुरा के. या स्पर्धकांनी मान पटकावला. शिस्तबद्ध पथक म्हणून औरंगाबादच्या ‘आपलंच वाद्य’ या पथकाचा सन्मान करण्यात आला.विजेत्या पथकाला दीड लाखांचे पारितोषिक देऊ न चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर उपविजेत्या पथकाला एक लाखांचे पारितोषिक देऊ न केंद्रे यांच्या हस्ते, तर तृतीय क्रमांकाला ५० हजारांचे पारितोषिक देऊ न विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी गौरवले. वैयक्तिक पारितोषिक जिंकणाऱ्यांनाही मान्यवरांनी सन्मानित केले. ही स्पर्धा यापुढेही सुरू राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिले. तर दीपेश म्हात्रे यांनी आगामी काळात ही स्पर्धा डोंबिवली पश्चिमेला खाडीकिनारी भरवण्यात यावी, असे आवाहन केले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधींच्या निधीची विशेष तरतूद केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आहेत. रायगड येथेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे प्रामुख्याने संवर्धन, जतन करण्यासाठी राजांनी आवर्जून यावे, सूचना द्याव्यात, असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले. आरंभ प्रतिष्ठानला शिवजयंतीला दिल्लीमध्ये त्यांची कला सादर करण्यासाठी संभाजी राजांनी संधी दिल्याचे त्यांनी जाहीर केले.सोहळ्याच्या शुभारंभाला उद्घाटक म्हणून महापौर विनीता राणे, नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर, कल्पना किरतकर, मुकुंद पेडणेकर, सभापती साई शेलार, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेविका ज्योती मराठे, ठामपाचे नगरसेवक संजय वाघुले, शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर, रवी ठाकूर, उपायुक्त सुनील जोशी आदींनी आवर्जून उपस्थिती लावली.पद्मश्री वामन केंद्रे यांचा सत्कार‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’चे माजी संचालक वामन केंद्रे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा सर्वप्रथम जाहीर सत्कार प्रतिष्ठानतर्फे संभाजी राजे यांच्या हस्ते झाला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गडकिल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार छत्रपती संभाजी राजेंनी केला.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती