शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरणा-या दोघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

ठाणे : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या घरात प्रवेश करून दोघांनी त्यांच्या घरातील मोबाइल चोरून ...

ठाणे : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या घरात प्रवेश करून दोघांनी त्यांच्या घरातील मोबाइल चोरून नेल्याची घटना २ जुलै रोजी पहाटे ४ च्या सुमारास कळवा येथील टीएमटी बसडेपोजवळ असलेल्या परिसरात घडली. यामध्ये साक्षीदाराने ही घटना पाहिल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार, कळवा पोलीस ठाण्यात सनी ढोकलिया (१७) आणि प्रशांत बर्नवाल (१७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळवा पोलीस करीत आहेत.

-------------------------------------

बोलण्यात गुंतवून ८२ हजारांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांभळीनाका भागात २९ वर्षीय फिर्यादी यांना दोन अनोळखी इसमांनी बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्याजवळील ८२ हजार रुपये काढून घेऊन पोबारा केल्याची घटना २ जुलै रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------

दोन दुचाकी चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मयूरेश पार्क इमारतीच्या समोर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर ४७ वर्षीय फिर्यादी यांनी आपली दुचाकी पार्क करून ठेवली होती. परंतु, ३ जुलै रोजी अज्ञात चोराने ती चोरून नेली आहे. याप्रकरणी कळवा पोलीस पुढील तपास करीत आहेत. दुसऱ्या एका घटनेत वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादींनी पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेल्याची लोकमान्यनगर पाडा नं. ४ या भागात दुपारी २.३० ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------------------------

गाडीतील कारटेप चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर.जे. ठाकूर कॉलेज परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी यांनी पार्क करून ठेवलेल्या चारचाकी वाहनाची पुढील दरवाजाच्या डाव्या बाजूची काच फोडून कारमधील कारटेप चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------------

दुचाकीचालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या ४२ वर्षीय फिर्यादी यांचा भरधाव टेम्पो त्यांच्या बाजूने गेल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. तेवढ्यात, पाठीमागून येणा-या कंटेनरचा धक्का त्यांच्या उजव्या हाताच्या कोप-यास लागण्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. सदरची घटना २ जुलै रोजी सायंकाळी ७.४५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

--------------------------------------

मोबाइल चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठेनगर भागात फिर्यादी झोपलेले असताना त्यांच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञाताने प्रवेश करून त्यांच्या घरात असलेला मोबाइल चोरून नेल्याची घटना २ जुलै रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------------------------------------

अपघातात तिघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : दुचाकीवरून तिघे जण घोडबंदर भागातील भाईंदरपाडा येथे जात असताना पातलीपाडा ब्रिजवर उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये तिघेही जखमी झाले आहेत. सदरची घटना २ जुलै रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली. ट्रक बंद अवस्थेत होता, मात्र त्यावरील ट्रकचालकाने तशी कोणतीही सूचना अथवा मागे उभे राहून त्याची माहिती पाठीमागून येणा-या वाहनचालकांना दिली नव्हती, असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार, या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-----------------------------------