शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती हत्याकांडचा क्रूरकर्मा साने विरोधात ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल

By धीरज परब | Updated: September 7, 2023 23:13 IST

सुमारे बाराशे पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले . 

मीरारोड - मीरारोड मध्ये घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि सर्वाना हादरवणाऱ्या अश्या सरस्वती वैद्य (३२) हत्याकांडाचा क्रूरकर्मा आरोपी मनोज साने ( ५६ ) विरुद्ध नया नगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे . सुमारे बाराशे पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले . 

मूळचा बोरिवलीच्या बाभईचा असलेला मनोज साने हा सरस्वती सोबत मीरारोडच्या गीता नगर मधील गीता आकाशदीप इमारतीत भाड्याने २०१७ पासून रहात होता . विषारी कीटकनाशक देऊन ४ जून २०२३ रोजी सरस्वतीची हत्या केल्या नंतर त्याने मृतदेह सोबर नग्न फोटो काढले . मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धा वालकर हत्याकांड मधून तसेच इंटरनेट वरून शोधले.  मृतदेहाचे कटर ने तुकडे करून कुकर मध्ये शिजवले व काही भाजले. थोडे तुकडे त्याने बाहेर फेकले . ६  जून च्या रात्री पोलिसांना शेजाऱ्या कडून समजल्यावर त्याला पकडले . 

पोलिसांना घरातून सरस्वतीचे ३० ते ३५ तुकडे, कटर, कीटकनाशक बाटली , कुकर, टोप व दोघांचे मोबाईल आदी सापडले . मोबाईल मधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला . डिसेंम्बर २०२२ पासून दोघां मध्ये खटके उडत होते . १० वर्ष गोष्ट लपवून ठेवल्याचा जाब सरस्वती ने विचारला होता. मोबाईल मध्ये पॉर्न व्हिडीओ पाहणे , अन्य महिलांशी चॅटिंग करणे समोर आले . साने याला दुर्धर लैंगिक आजार आहे का ? व ती माहिती सरस्वती पासून लपवून ठेवल्या वरून वाद सुरु झाल्याची शक्यता त्यावेळी पोलिस सूत्रांनी सांगितली होती . 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला होता . साने सध्या कारागृहात आहे . सोमवार ४ सप्टेंबर रोजी नया नगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात साने वर हत्ये सह विविध कलमां खाली गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल केले आहे . सुमारे १२०० पानांचे आरोपत्र असून त्यात साने व सरस्वती लिव्ह इन मध्ये रहात होते . साने याने आधी विष देऊन हत्या केली . तिचे तुकडे करण्यासाठी वापरलेली उपकरणे आदी अनेक पुरावे पोलिसांनी नमूद केले आहेत . तिच्या बहिणी , शेजारी , डॉक्टर पासून एकूण ६२ साक्षीदार पोलिसांनी नमूद केले आहेत .  मानसिक दृष्ट्या साने हा फिट असल्याचा अहवाल असून  शव विच्छेदनचा अंतिम अहवाल अजून प्रलंबित असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .