शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मेहतांच्या कार्यालयाला घेराव, स्कूल व्हॅनची चावी काढल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:19 IST

मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर अ‍ॅकॅडमी शाळेच्या बसव्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शिवाय, व्हॅनची चावी काढून घेतल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कार्यालयास घेराव घातला. दरम्यान, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ही वाहने सरकारच्या निकषाप्रमाणे नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे तक्रार केल्याचे मेहतांनी स्पष्ट केले.

मीरा रोड : मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर अ‍ॅकॅडमी शाळेच्या बसव्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शिवाय, व्हॅनची चावी काढून घेतल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कार्यालयास घेराव घातला. दरम्यान, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ही वाहने सरकारच्या निकषाप्रमाणे नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे तक्रार केल्याचे मेहतांनी स्पष्ट केले.शाळेच्या बस असल्या तरी त्या सेवेचे शुल्क न परवडणाºया पालकांनी अन्य व्हॅनचा पर्याय निवडला. परंतु, शाळेच्या बसव्यतिरिक्त विद्यार्थी नेणाºया व्हॅनविरोधात मेहतांनी वाहतूक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांच्याकडे तक्रार केली. आमदारांची तक्रार आल्याने पोलिसांनीही गेल्या आठवड्यात कारवाई केली.दरम्यान, मेहतांनी एका व्हॅनची चावी काढली. त्यावरून पालक संतप्त झाले. त्यांनी शाळेजवळील सेव्हन इलेव्हनच्या कार्यालयास घेराव घातला. एका विद्यार्थ्याने सांगितले की, मेहता यांनी येऊन व्हॅनची चावी काढत विद्यार्थ्यांना गुराढोरांसारखे कोंबल्याचे सांगत व्हॅनचालिकेशी अरेरावी केली. व्हॅनची क्षमता १४ विद्यार्थ्यांची होती आणि १० विद्यार्थी त्यात होते, असे तो म्हणाला.मेहतांच्या शाळेची बससेवा घ्या, असे सांगितले जाते. पण, परवडत नसल्याने आम्ही घेत नाही. पण, त्यांच्या दबावाखाली पोलीस आम्हाला धमकावत असल्याचा आरोप पालकांनी केला.मेहतांकडून खंडन-नरेंद्र मेहता यांनी मात्र आपण शाळेची बससेवा घेण्यासाठी कुणाही पालकांना सांगत नाही. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया शाळेच्या बससाठी सरकारचे निकष आहेत. त्याचे पालन केले जात नाही. विद्यार्थ्यांना जास्त संख्येने या वाहनांमध्ये कोंबले जाते. हे निदर्शनास आले असतापोलिसांकडे तक्रार केल्याचेसांगितले. चावी काढणे, महिलेस अरेरावीने बोलणे आदी प्रकार घडले नसल्याचे ते म्हणाले.