शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनासाठी वाहतूकमार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:21 IST

तीन दिवस त्रास : वाहतूक पोलिसांचा निर्णय

ठाणे : ठाणे शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जनमार्गावर वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पाच दिवसांच्या (६ सप्टेंबर), सात दिवसांच्या (८ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (१२ सप्टेंबर) या तीन दिवसांच्या काळात वाहतूकमार्गात बदल केले आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.

याा दिवसांच्या कालावधीमध्ये वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव तसेच वर्तकनगर येथील उपवन तलाव या ठिकाणी ठाण्यासह मुंबई उपनगरांतील श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पुढीलप्रमाणे बदल केले आहेत.मॉडेला चेकनाका येथून वागळे इस्टेट विभागाकडे जाणाऱ्या टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना सिंधुदुर्ग हॉटेल येथून मुख्य रस्त्याने (स.गो. बर्वे मार्गाने) जाण्यास प्रवेश बंद केला आहे. त्यासाठी मॉडेलनाका येथून रोड क्रमांक १६ आणि वागळे इस्टेट विभागाकडे जाणारी वाहने सिंधुदुर्ग हॉटेल येथे डावीकडे वळून जगदाळे ट्रान्सपोर्ट येथे उजवीकडे वळून शांताराम चव्हाण मार्गाने एमआयडीसी आॅफिस येथे डावीकडे वळून मुख्य रस्त्याने जातील.याठिकाणचे मार्ग बंद : वागळे इस्टेट, रोड क्रमांक १६ कडून मॉडेलनाक्याकडे जाणाºया टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना रोड क्रमांक १६ पेट्रोलपंप येथे प्रवेश बंद केला आहे. त्यासाठी रोड क्रमांक १६ येथून मॉडेलानाका, मुंबईकडे जाणारी वाहने रोड क्रमांक १६ येथून डावीकडे वळून अ‍ॅग्रीकल्चर कार्यालय-ब्राडमा कंपनीमार्गे कामगार हॉस्पिटल रोडने नितीन जंक्शनमार्गे जातील.हे मार्ग राहणार बंदच्मॉडेला चेकनाकामार्गे तीनहातनाका येथे वळण घेऊन जाणाºया बसेसना मॉडेला चेकनाका येथे प्रवेश बंद केला आहे. मुलुंड चेकनाका येथेच प्रवासी उतरवतील आणि तिथूनच प्रवासी घेऊन परत मुंबईकडे जातील.च्देवदयानगरनाका, कॉस येथून उपवन तलावाकडे जाणाºया टीएमटी बसेससह सर्व प्रकारच्या वाहनांना येऊर गेटपर्यंत प्रवेश बंद केला आहे. त्यापुढे मुख्य दुतर्फा रस्त्याने उपवन तलावाकडे जाण्यास प्रवेश बंद आहे. पर्यायी मार्ग- देवदयानगर क्रॉसनाका येथून उपवन तलाव गावंडबाग क्रमांक-२ विभागाकडे जाणारी वाहने मंत्रांजली बंगला-नीळकंठ हाइट्समार्गे मुख्य रस्त्याने पुढे जातील.च्कृत्रिम उपवन तलाव पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार गावंडबागकडून येऊर गावाकडे उपवनमार्गे जाणाºया दुतर्फा रस्त्याने टीएमटी बसेससह सर्व वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यांनी नीळकंठ हाइट्समार्गे देवदयानगरनाका क्रॉस-शिवाईनगर सर्कलमार्गाचा वापर करावा.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी