शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीसाठी ठाणे शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 22:03 IST

 शहरातील प्रमुख दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यातील ३०० हून अधिक गोविंदा पथके ठाण्यात येतात. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

ठाणे, दि. 14 -  शहरातील प्रमुख दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यातील ३०० हून अधिक गोविंदा पथके ठाण्यात येतात. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.दहीहंडीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून काही मार्गांमध्ये बदल केले असून काही मार्ग तात्पुरते बंद केले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी ब्रिज, तीनहातनाका, धर्मवीरनाका, नितीन कंपनीनाका येथून ठाणे शहरात (वंदना डेपो-स्टेशन बाजूस) येणाºया एसटी, टीएमटी, बेस्ट आणि खासगी बसना या नाक्यावरून ठाण्यात येण्यास आणि ठाणे स्टेशनकडून वरील नाक्यामार्गे जाण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी या बस कॅडबरीनाका-खोपटनाका-आंबेडकर रोडने जी.पी. ओकडे तसेच गोल्डन डाइजनाकामार्गे मीनाताई ठाकरे चौकाकडून जीपीओ नाक्यावरून कोर्टनाका-आंबेडकर पुतळा-जांभळीनाका भाजी मार्केटमार्गे ठाणे स्टेशनकडे जातील.ठाणे स्टेशन सॅटीस ब्रिजवरून टॉवरनाक्याच्या दिशेने जाणा-या सर्व टीएमटी, एसटी बसना सॅटीस ब्रिज येथेच प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी या बस ठाणे रेल्वे स्टेशनकडून सॅटीसवरून दादा पाटीलवाडीमार्गे गोखले रोडने टेलिफोननाका-तीनहातनाक्याकडून इच्छित मार्गाकडे जातील. तसेच सर्व गोविंदा पथकांच्या वाहनांना कोपरी ब्रिजनाका, तीनहातनाका, धर्मवीरनाका-नितीन कंपनी, कॅडबरीनाका येथून ठाणे शहरात आणि स्टेशन बाजूला जाणाºया वाहनांना या नाक्यांवर प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून ही सर्व वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या सेवारस्त्यावर पार्किंग करण्याचे आवाहन केले आहे.नो पार्किंग :* ठाणे महापालिका भवन ते अल्मेडा चौक तसेच महापालिका भवन ते ओपन हाउस-आराधना क्रॉस, ओपन हाउस ते भक्ती मंदिर यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई आहे.* टॉवरनाका-गडकरी रंगायतन-बोटिंग क्लबपर्यंत मासुंदा तलाव रोडच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई केली आहे.ही अधिसूचना पोलीस, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात हे बदल राहणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.