शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

खोट्या माहितीव्दारे शिक्षकांचे बदल्यांमध्ये चांगभले; अन्यायग्रस्त शिक्षक न्यायालयात जाण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 6:28 PM

या प्राथमिक शिक्षकांच्याआॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेचा विचार न करता या बदल्या झाल्याची चर्चा आहे. या शिवाय या जिल्हाअंतर्गत बदल्या करताना शासननिर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सोयीच्या बदल्या केल्याचा आरोप केले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. बदल्या झालेल्या दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोईच्या शाळा घेतल्याची माहिती अन्यायग्रस्त शिक्षकांच्या हाती लागली

ठळक मुद्देशिक्षकांनी प्राधान्यक्रमाने सोयीच्या शाळेवर बदलीसाठी खोटी माहिती, बोगस वैद्यकीय दाखले आदी खोटी माहिती.अन्यथा प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारीबदल्या झालेल्या दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोईच्या शाळा

ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मंगळवारी झाल्या. मात्र, काही शिक्षकांनी प्राधान्यक्रमाने सोयीच्या शाळेवर बदलीसाठी खोटी माहिती, बोगस वैद्यकीय दाखले आदी खोटी माहिती दिल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून या खोट्या माहितीची वेळीच शहानिशा करून हा अन्याय दूर करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.अन्यथा प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षकांमध्ये दिसून येत आहे.        या प्राथमिक शिक्षकांच्याआॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेचा विचार न करता या बदल्या झाल्याची चर्चा आहे. या शिवाय या जिल्हाअंतर्गत बदल्या करताना शासननिर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सोयीच्या बदल्या केल्याचा आरोप केले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. बदल्या झालेल्या दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोईच्या शाळा घेतल्याची माहिती अन्यायग्रस्त शिक्षकांच्या हाती लागली आहे. अवघड क्षेत्रातील शाळे ऐवजी सोपा क्षेत्राच्या शाळेत बदल्या झालेल्या शिक्षकांच्या माहितीची व वैद्यकीय दाखल्यांची खातर जमा वेळीच न केल्यास संबंधीत अन्यायग्रस्त शिक्षक न्यायालयाचे दरवाज थोटावण्याच्या तयारीत आहे.भागाऐवजी सोप् बदली झालेल्याजिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत या आॅनलाइन बदल्या पुणे येथून ‘एनआयसी’ यंत्रणेव्दारे केल्या आहेत. सर्व बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासननिर्णया प्रमाणे कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले असताना देखील याचे उल्लंघन होऊन या बदल्यांची प्रक्रि या राबवल्या आहेत, त्यात अनेक शिक्षकांनी खोटी माहिती देऊन बहुतांशी पात्र व सेवा जेष्ठता असलेल्या शिक्षकाना आदिवासी दुर्गमभागातील आवघड क्षेत्राच्या शाळांवर जाण्याचा प्रसंग ओढावला आहे. या मध्ये महिला शिक्षकांचाही मोठ्याप्रमाणात समावेश आहे.या बदल्यांमध्ये पतीपत्नी चे एकत्रीकरण करताना दोघाच्या शाळेतील अंतर ३० किलोमीटर असल्याची खोटी माहिती नोंदवण्यात आली असल्याचे ऐकायला मिळत आहे. या बदल्यांमध्ये ठाणे जिल्हातीलच शिक्षकांना पतीपत्नी एकत्रीकरणाच लाभ मिळावा असे शासननिर्णयात नमुद केले आहेत. पण इतर जिल्हा परिषदेच्या ३० किलोमीटरच्या शाळा दाखवून लाभ घेतल्याचे बोलले जात आहे. जुनी शाळा अवघड क्षेत्रातील शाळा असल्याचे दाखवून लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये विशेषत: पालघर जिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकाची शाळा अवघड नसताना देखील ती शाळा अवघड असल्याचे दाखवून सोयीच्या शाळेचा लाभ घेतल्याचे दिसून येत असल्याची जोरदार चर्चा आहे. याची प्रशासनाने खातर जमा करण्यासह दुर्धर आजाराचे खोटे दाखले दिल्याचे बोलले जात आहे. याप्रमाणेच विविध संवर्गात लाभ घेणाऱ्याा शिक्षकांची कागदपत्रे, पतीपत्नीचे अंतर प्राथमिक स्तरावर तपासून खातरजमा न केल्याने त्यांना प्राधान्यक्र माचा लाभ सरसकट दिल्याने इतरांवर अन्याय झाल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.