शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक प्लाझा'साठी ठाण्यातील तीन ठिकाणच्या वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 22:29 IST

सकाळी ५.३० ते ८ वाजेपर्यंत वाहनाना पर्यायी मार्ग 

ठाणे: ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पोस्ट कोव्हिड नंतरच्या काळात सकाळच्या वेळेत व्यायाम व मॉर्निंग वॉक प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक बनल्याने सुरक्षितपणे व्यायाम व चालता येण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून ठाण्यात तीन ठिकाणी येत्या १ एप्रिलपासून ''मॉर्निंग वॉक प्लाझा'' शुभारंभ होत आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या तीन ठिकाणावरील वाहतुकीत सकाळच्या वेळेत बदल केला आहे.  हा बदल ३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर असल्याचे म्हटले असून वाहन चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने शरिरात रोग प्रतिकारकशक्ती वाढावी आणि नियमित व्यायाम करावा, या उद्देशाने बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. या परिसरातील मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी अपघात होऊन जिवितहानी होवू नये तसेच या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत सुनिश्चित होण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार वाहतुक शाखेने अधिसूचना काढली आहे.

या ठिकाणी वाहनांना नो-एण्ट्री ; पर्यायी मार्ग शहरातील तीन हात नाकाकडून उजव्या बाजूच्या सर्व्हिस रोडने धर्मवीरनगर नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तीन हात नाका येथे प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे ती वाहने हरिनिवास मार्गे मार्गक्रमण करतील. तर, धर्मवीरनगर नाका सर्व्हिसरोडने तीन हात नाका कडे जाणाऱ्या वाहनांना धर्मवीरनगर नाका येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने धर्मवीरनगरनाका येथून पूर्व द्रुतगती महामार्गाने पुढे जातील. तसेच पायलादेवी मंदिर प्रवेशद्वारपासून उपवन अॅम्पीथिएटरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथे डावीकडील मार्गिकेत प्रवेश बंद आहे. या वाहनांना पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथून उजव्या मार्गिकेतून अॅम्पीथिएटरकडे जावे लागणार आहे.

याशिवाय कोकणी पाडा, बिरसा मुंडा चौकाकडून हिरानंदानी मेडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर चौक कडे पवारनगर नवीन रोडच्या डावीकडील एका वाहिनीवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केल्याने ती वाहने बिरसा मुंडा चौक येथुन महाराजा अग्रसेन चौककडे जाणाच्या उजव्या मार्गिकेमधुन दुहेरी वाहतुकीने मार्गक्रमण करतील, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणे