शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जीवनशैली बदलून कायदा, सुव्यवस्थेला हातभार लावा

By admin | Updated: May 11, 2017 01:56 IST

उपेक्षित जीवनशैली बदलून स्वाभीमानाने जगण्याचे आणि सोबतच शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हातभार लावण्याचे आवाहन पोलिसांनी मंगळवारी ठाण्यातील तृतियपंथियांना केले.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उपेक्षित जीवनशैली बदलून स्वाभीमानाने जगण्याचे आणि सोबतच शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हातभार लावण्याचे आवाहन पोलिसांनी मंगळवारी ठाण्यातील तृतियपंथियांना केले. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पोलीस मैदानावर तृतियपंथियांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरासाठी ठाण्यातील तृतियपंथियांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि विधी सेवा प्राधिकरणाचे अ‍ॅड. सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सिग्नल्सवर लोकांना पैसे मागणे किंवा अनैतिक व्यवसायात गुंतण्यापेक्षा स्वाभीमानाने जगण्याचे आवाहन दौंडकर यांनी केले. समाजात वावरताना तृतियपंथिय पोलिसांना चांगली मदत करू शकतात. बेकायदेशीर कृत्यांची माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासही ते मदत करू शकतात. पोलीस यंत्रणाही तृतियपंथियांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. त्यासाठी कोणत्याही क्षणी आपण स्वत: मदतीसाठी तत्पर असल्याचे दौंडकर यांनी सांगितले. अ‍ॅड. सावंत यांनी यावेळी तृतियपंथियांसाठी शासनाच्या असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. वेगवेगळ्या उद्योगांसाठी शासनातर्फे तृतियपंथियांना प्रशिक्षण दिले जाते. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तामिळनाडूमध्ये एक तृतियपंथिय पोलीस अधिकारी झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.