शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कल्याण शहर जिल्हा काँग्रेसमध्ये बदलाचे वारे, निवडणूक लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:32 IST

कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. आॅक्टोबरमध्ये जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार असून यंदा तरी डोंबिवलीकडे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व द्यावे

प्रशांत मानेकल्याण : कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. आॅक्टोबरमध्ये जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार असून यंदा तरी डोंबिवलीकडे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व द्यावे, अशी मागणी तेथील कार्यकर्त्यांकडून होत आहे.कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस पक्षाला पुरती उतरती कळा लागली आहे. २००५ च्या निवडणुकीत पक्षाचे २१ नगरसेवक केडीएमसीवर निवडून गेले होते. हाच आकडा २०१० च्या निवडणुकीत १५ वर आला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत तर पक्षाचे केवळ चार नगरसेवकच निवडून आले. या उतरत्या कळेला पक्षातील गटबाजी आणि पक्ष वाढवण्याऐवजी एकमेकांची प्रदेशपातळीवर काढली जाणारी उणीदुणी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये नव्या जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. दुसºया किंवा तिसºया आठवड्यात ही निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्हाध्यक्षपदावरून कल्याण-डोंबिवलीत रस्सीखेच सुरू झाली आहे. कल्याणमध्ये आमदार संजय दत्त आणि प्रकाश मुथा यांचे गट सध्या सक्रिय असले तरी डोंबिवलीत जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण रिंगणात आहेत.डोंबिवलीतील आॅगस्टमध्ये झालेल्या बैठकीत नकुल पाटील व सुदाम भोईर यांच्यानंतर शहराला जिल्हाध्यक्ष मिळालेला नसल्याने यंदाचा जिल्हाध्यक्ष डोंबिवलीतून निवडावा, अशी आग्रही मागणी पदाधिकाºयांनी केली. डोंबिवलीतील संतोष केणे, गंगाराम शेलार, नंदू म्हात्रे व अमित म्हात्रे हे जिल्हाध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. सध्या त्यांनी मौन बाळगले असले तरी सर्वानुमते जिल्हाध्यक्ष निवडला जावा, निवडणूक होऊ नये, अशी भूमिकाही निरीक्षकांच्या बैठकीत घेतली गेली. परंतु, मुथा आणि दत्त यांच्यापुढे डोंबिवलीकरांची डाळ शिजणार का, याबाबतही साशंकता आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस