शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवानिमित्त घाेडबंदर रोडवरील वाहतूक मार्गात बदल, वाहतूकीची अधिसूचना

By जितेंद्र कालेकर | Updated: October 10, 2023 23:52 IST

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नवरात्रोत्सव तसेच दसरा सणानिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कासारवडवली परिसरातील वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली. २४ ऑक्टाेंबर रोजी दुपारी २ ते देवीच्या मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत ही अधिसूचना अंमलात राहणार असल्याचेही वाहतूक शाखेने आदेशामध्ये म्हटले आहे.

उपायुक्त राठोड यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, कासारवडवली परिसरात नवरात्रोत्सव आणि दसरा सणानिमित्त २४ ऑक्टाेंबर रोजी मोठया प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी नवरात्र देवी मूर्ती, घट आणि फोटो प्रतिमा यांचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे विसर्जन घाटाच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या भागात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या मार्गात बदल केला आहे. गुजरात महामार्गाने ठाण्याच्या घाेडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठया वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद केला आहे. तसेच मुंबई, वसई, विरारकडून घाेडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठया वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद राहणार आहे. त्याचबरोबर घाेडबंदर रोडने ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठया वाहनांना गायमुख जकात नाका याठिकाणी प्रवेश बंद केला आहे.

त्याऐवजी - गुजरात, मुंबई, विरारकडून घाेडबंदर रोडच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची मोठी वाहने चिंचोटी नाका येथून कामण- अंजूर फाटा- माणकोली भिवंडी मार्गे पुढे सोडण्यात येणार आहेत. ही अधिसूचना पोलिसांची वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि गणेश विसर्जनातील वाहनांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक