शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हरित लवादाच्या निर्णयाला पालिका देणार आव्हान

By admin | Updated: August 1, 2015 23:39 IST

वसई तालुक्यातील सकवार येथे प्रस्तावित घनकचरा प्रकल्प बीओटी तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी होणाऱ्या सुमारे १५० कोटी खर्चापैकी सुरुवातीला किमान ५० टक्के रक्कम कोकण

- राजू काळे,  भार्इंदरवसई तालुक्यातील सकवार येथे प्रस्तावित घनकचरा प्रकल्प बीओटी तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी होणाऱ्या सुमारे १५० कोटी खर्चापैकी सुरुवातीला किमान ५० टक्के रक्कम कोकण विभागीय आयुक्तालयासोबतच्या एस्क्रो खात्यात जमा करण्याच्या हरित लवादाच्या निर्णयाला पालिका न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले. पालिकेने २००८ मध्ये उत्तन-धावगी येथे बीओटी तत्त्वावर सुरू केलेल्या डम्पिंग ग्राउंडचा ठेका हँजेर बायोटेक प्रा.लि. या खाजगी कंपनीला दिला होता. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोधझाल्यानंतर तो सकवार येथील सुमारे ७५ एकर शासकीय भूखंडावर प्रस्तावित केला आहे. त्या जागेपोटी पालिकेने ७३ लाख रु. शासनाकडे केले असून येथील डम्पिंग ग्राउंडवर वीज प्रकल्पासह कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करता येण्याजोगा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ निविदा प्राप्त झाल्या आहेत. उत्तन येथील प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून २८ मे रोजी हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेवर २१ जुलै रोजी सुनावणी घेण्यात आली होती. पालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लवादाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सकवार प्रकल्प १८ महिन्यांत सुरू करण्याचा दावा केला असतानाच या प्रकल्पासाठी किती खर्च येणार असल्याची विचारणा लवादाने पालिकेला केली होती. त्यावर पालिकेने प्रकल्पासाठी सुमारे १५० कोटींचा खर्च येणार असून प्रकल्प बीओेटी तत्त्वावर सुरू करण्यात येणार असल्याने तो खर्च ठेकेदाराकडूनच करण्यात येणार असल्याचा दावा केला होता. परंतु, ठेकेदाराच्या निधीची वाट न पाहता पालिकेने सुरुवातीला एकूण खर्चाच्या किमान ५० टक्के रक्कम ६ आठवड्यांत कोकण विभागीय आयुक्तालयासोबत एस्क्रो खाते उघडून त्यात जमा करण्याच्या आदेश लवादाने दिला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखालील तज्ज्ञ संस्थेच्या सदस्य व पालिका आयुक्तांचा सहभाग असलेली समिती २० दिवसांत स्थापण्याचे निर्देश लवादाने दिले आहेत. परंतु, सुमारे ३५० कोटी मूळ उत्पन्न असलेल्या अंदाजपत्रकानुसार सुमारे ७५ कोटींचा निधी कसा उपलब्ध होणार, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.