शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:20 IST

महानगर पालिकेतील सर्व विभागातील कंत्राटी कामगारांनी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात शुक्रवारी साखळी उपोषण केले.

नवी मुंबई : महानगर पालिकेतील सर्व विभागातील कंत्राटी कामगारांनी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात शुक्रवारी साखळी उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली.कंत्राटी कामगारांना कायम करा, तसेच किमान वेतन त्वरित लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश असलेले निवेदन महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याची प्रतिक्रिया आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली असून या वक्तव्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र या मागण्यांवर सकारात्मक भूमिका न घेता लवकरात लवकर पाऊल न उचलल्यास येत्या २२ आॅगस्टला महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. महापालिकेतील विविध विभागांमध्ये सध्या साडेसात हजार कामगार कार्यरत असून अपुºया वेतनामुळे कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून प्रशासनाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप या उपोषणादरम्यान करण्यात आला. महागाईच्या काळात कामगारांना तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह करणे अशक्य असून प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे हजारो कुटुंबांना याची झळ बसत असल्याचा असंतोष कामगार नेते रमाकांत पाटील यांनी व्यक्त केला.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना वाढीव वेतन मिळावे, अशी मागणी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस सुरेश ठाकूर यांनी केली.उपोषणाला कामगार नेते अ‍ॅड. सुरेश ठाकूर, कामगार नेते रमाकांत पाटील, संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे, उपाध्यक्ष सुनील शिर्के, सचिव राजेश सरोदे, उपाध्यक्ष यशवंत काळे आणि महापालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेला कामगार वर्ग मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाला होता.कंत्राटी कामगारांच्या मागण्या कंत्राटी कामगारांना कायम करावे. किमान वेतन त्वरित लागू करावे मागील ५८ महिन्यांचा फरक थकबाकीसह दिला जावा. भविष्य निर्वाह निधीची माहिती कामगारांना द्यावी. कंत्राटी कामगारांना मनपाचा उल्लेख असलेले ओळखपत्र मिळावे. आरोग्य विमा योजनेची कपात केल्यानंतर देखील आरोग्य सेवा कामगारांना मिळत नाही त्याची माहिती दिली जावी. समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे.