शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दृकश्राव्य माध्यमातून घेतला पाणी टंचाई आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 18:39 IST

बुधवारी त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून पाणी टंचाई कामांची आढावा बैठक घेतली.

ठाणे: कोरोनाच्या संकटाचा लढा सुरु असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होण्यापूर्वी पाण्याचा ट्रॅंकर गाव पाडे वस्त्यांवर पोहोचायला हवा. शिवाय ठिकठिकाणी सुरु असणारी टंचाईची कामे जलद गतिने पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बुधवारी त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून पाणी टंचाई कामांची आढावा बैठक घेतली.

एप्रिल-मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यात गावांमध्ये असणारे पाण्याचे विविध स्त्रोत आटल्याने पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे दरवर्षी टंचाई आराखडा मंजूर करून त्या माध्यमातून पाणी टंचाई कामे मार्गी लावली जातात. यंदा जरी कोरोनाचे संकट असले तरी जिल्हा परिषदेने योग्य खबरदारी घेत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात टंचाई कामे सुरु केली आहेत.

आजच्या घडीला शहापूर तालुक्यात ३७ गावं आणि ११९ पाड्यांवर ३१  ट्रॅंकर पाणी पुरवठा केला जात आहे. तर मुरबाड मध्ये ४ गावं आणि १८ वाड्यांवर पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एच. एल. भस्मे यांनी दिले.  त्याच बरोबर  भिवंडी तालुक्यात ८१ ठिकाणी विधन विहिरी ( बोरवेल ) चे काम सुरु झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील यांनी वाफे गावात  टंचाई कामांची पाहणी देखिल केली.

या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांच्यासह उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) तथा कल्याण तालुका संपर्क अधिकारी  डी. वाय. जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार ( पंचायत ), उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी पुरवठा ) तथा शहापूर संपर्क अधिकारी छायादेवी शिसोदे, शिक्षणाधिकारी तथा भिवंडी तालुका संपर्क अधिकारी संगीता भागवत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) तथा मुरबाड संपर्क अधिकारी संतोष भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा अंबरनाथ तालुका संपर्क अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे,कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा ) एच. एल. भस्मे, गट विकास अधिकारी शहापूर अशोक भवारी, गट विकास अधिकारी मुरबाड रमेश अवचार, गट विकास अधिकारी भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे, गट विकास अधिकारी अंबरनाथ शीतल कदम आदी अधिकारी यांनी सहभाग घेतला.

कोरोनाच्या सध्यस्थितीचा घेतला आढावाया दरम्यान सोनवणे यांनी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी, शहापूर या पाचही तालुक्यातील कोरोनाची सध्यस्थिती जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून खबरदारीच्या उपायोजना करण्यात आहेत.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागासह इतर सर्व विभाग कार्यरत आहे. नेमून देण्यात आलेले संपर्क अधिकारी वेळोवेळी तालुक्यांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

टॅग्स :thaneठाणे