शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीत १० मिनिटे सिग्नल फेल झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:21 IST

ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाल्याच्या समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनूसार ही समस्या १० मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. चारही मार्गावरील वाहतूक लोकल कोंडीमुळे अर्धा तास बंद होती, तर त्यानंतर बराच वेळ संथगतीने लोकल धावल्या.

ठळक मुद्दे कल्याण-डोंबिवली मार्गावर लोकल कोंडी  हजारो प्रवाशांनी केला पटरीतून प्रवास

डोंबिवली: ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाल्याच्या समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनूसार ही समस्या १० मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. चारही मार्गावरील वाहतूक लोकल कोंडीमुळे अर्धा तास बंद होती, तर त्यानंतर बराच वेळ संथगतीने लोकल धावल्या.ठाकुर्ली स्थानकादरम्यान कि.मी. ५१ दरम्यानच्या पोलनजीकचा सिग्नल फेल झाल्याची घटना घडली, त्यामुळे लोकल थांबल्या, अप-डाऊन दोन्ही मार्गावरी रेल्वे सेवा या गोंधळामुळे प्रभावित झाली. लोकल जागच्या हालत नसल्याने प्रवाशांनी ठाकुर्ली, कल्याण, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी जागा मिळेल तेथे लोकलमधून उतरुन पटरीतून प्रवास केला. ठाकुर्ली, कल्याणच्या प्रवाशांनी रस्ता वाहतूकीचा पर्याय स्विकारत मार्ग काढला, तर डोंबिवली मार्गावरील प्रवाशांनी स्थानक गाठणे पसंत केले.दुपारी २.१५ ते दुपारी २.२५ पर्यंत हा घोळ सुरु होता, त्यानंतर सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाली. पण लोकल कोंडीमुळे समस्या अधिक तीव्र झाली, परिणामी दुपारच्या सत्रातील वेळापत्रक सपशेल कोलमडले. तीन लांबपल्याच्या गाड्यांनाही काहीसा विलंब झाला. त्यामुळे कल्याणसह ठाकुर्ली, डोंबिवली व अन्य स्थानकात नेहमीपेक्षा दुपार असूनही प्रवाशांची गर्दी झाली होती.आधीच उकाडा वाढल्याने प्रवासी हैराण असतांनाच रेल्वे ट्रॅकमध्ये उतरुन प्रवाशांना प्रवास करावा लागला. तळपत्या उन्हार ट्रॅक पार करतांना प्रवाशांमध्ये रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा दुपारी संपली होती, त्यामुळे त्या परिक्षार्थिंना परिक्षेला जाण्यासाठी त्रास झाला नसला तरी घरी परततांना जे हाल झाले, त्यामुळेही विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpiyush goyalपीयुष गोयल