शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अपांरपरीक उर्जेला केंद्राचा बूस्टर

By admin | Updated: July 7, 2015 23:56 IST

राज्यातील वीज टंचाईवर मात करण्यासाठी अणुउर्जेसह अपांरपरीक उर्जा निर्मितीवर अधिक भर दिला आहे. याच धोरणांतर्गत नजिकच्या भविष्यात एनर्जी कॉरीडोअरसह सौर कृषी पंप कार्यक्रमासह

नारायण जाधव  ठाणे राज्यातील वीज टंचाईवर मात करण्यासाठी अणुउर्जेसह अपांरपरीक उर्जा निर्मितीवर अधिक भर दिला आहे. याच धोरणांतर्गत नजिकच्या भविष्यात एनर्जी कॉरीडोअरसह सौर कृषी पंप कार्यक्रमासह तत्सम उर्जा प्रकल्पांसाठी सुमारे ९६१ कोटी तीन लाख रुपये खर्च करण्यास उर्जा खात्याने अखेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत केंद्र सरकारने तेराव्या वित्त आयोगांतर्गत शिफारस केली होती.तेराव्या वित्त आयोगाने प्रोत्साहन सहाय्यक अनुदान देतांना आखून दिलेल्या मागदर्शक तत्त्वानुसार ही रक्कम खर्च केली जाणार आहे. यानुसार एनर्जी कॉरीडोअर प्रकल्पासाठी महापारेषण कंपनीस २०० कोटी मिळणार आहेत. तर महावितरण कंपनीला नवीन उर्जा निर्मिती आणि वीज खरेदीसाठी २५० कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे.तसेच राज्यातील शेतकरी बांधवाकडून पाणी उपशासाठी सौर कृषी पंपाच्या वापरात वाढ व्हावी याकरीता विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यावर २५० कोटी खर्च करण्यास तेराव्या वित्त आयोगाने मान्य केले आहे. तसेच पारेषण विरहीत प्रकल्पांना १३५ कोटी रुपये आणि नवीन उर्जा विषयक योजना आणि कार्यक्रम राबविण्यासाठी १२६ कोटी खर्च करण्याची शिफारस करण्यात आली आहे.या बुस्टर डोसमुळे नजिकच्या भविष्यात राज्यातील अपांरपरिक उर्जेला प्रोत्साहन मिळून तिचा वापर अधिक प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून तिचा उपयोग होणार असल्याने प्रदूषण रोखण्यासह रोजगार निर्मितीसही मदत होणार आहे.