शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

भिवंडीत ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:51 IST

योग शिबिरांतून केले मार्गदर्शन; पोलीस, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

भिवंडी : शहरामध्ये विविध ठिकाणी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, पोलीस आणि नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानिमित्त नागरिकांनी शिबिरात सहभाग घेऊन नियमित योगासने करण्याचा निर्धार केला.शहरातील वºहाळामाता मंगल कार्यालयात पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ अंतर्गत अंबिका योग कुटीर यांच्याद्वारे योग शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शिबिरामध्ये योगासने प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व सांगितले. नियमित योगासने केल्याने पोट, मान, डोळे आणि शरीरातील विविध विकार दूर होतात. पोलिसांनी तणावमुक्त राहण्यासाठी नियमित योगासने करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.विविध शाळांमधूनही सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण व महत्त्व सांगण्यात आले. तालुक्यातील राहनाळ या गावात स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सपना राजेंद्र भोईर, पंचायत समिती सदस्य ललिता प्रताप पाटील यांच्या पुढाकाराने महिलांसाठी विशेष योगासने शिबिरे झाली. खोणी गावातील कोमल शिंगोळे यांनी योगाभ्यास वर्ग घेतला. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनीही पोलिसांसाठी कामतघर येथील वºहाळादेवी मंगल सभागृह येथे योग शिबिर घेतले.योगाभ्यासाचे धडेशेणवा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा खराडे अंतर्गत आवळपाडा, डोहळेपाडा, कुंभईवाडी, कवटेवाडी, चाफेवाडी, आंबेखोर, निमनपाडा या शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. शरीर, मन, आरोग्य, स्वास्थ्य राखण्यासाठी जीवनात योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे, हे यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देऊन योग, भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा फसाळे आणि सहशिक्षिका जयश्री पाटील यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना विविध आसनांबाबत मार्गदर्शन केले. ताणतणावांचे प्राणायामच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येते. मित्र, कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे, योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रप्रमुख मेंगाळसर यांनी केले.आत्मा मालिक संकुल येथे योगासनांची प्रात्यक्षिकेवासिंद : शहापूर तालुक्यातील मोहिली, अघई येथील आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडासंकुलात तसेच जिल्हा परिषद शाळा, वासिंद येथे पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील योगशिक्षक पुरु षोत्तम पानगुडे, ए.जी. डुकरे, गिरीश लिहे, दराडे यांनी योगाचे महत्त्व विशद करून प्राणायाम व विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन