शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वसुबारस साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 04:20 IST

वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासीबांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवू पाहत आहेत. यासाठी आदिवासी भाषा, संस्कृती हा अस्सल ठेवा म्हणून सिद्ध झाला आहे.

ठाणे - वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासीबांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवू पाहत आहेत. यासाठी आदिवासी भाषा, संस्कृती हा अस्सल ठेवा म्हणून सिद्ध झाला आहे. यास कायम ठेवण्यासाठी यंदाही ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वारली, कोकणा, महादेव कोळी, कातकरी, क-ठाकूर, म-ठाकूर जमातींमधील आदिवासीबांधवांनी रविवारी येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वसुबारस पारंपरिक वेशभूषेत साजरी केली.पूर्वजांनी जपून ठेवलेली संस्कृती आधुनिक काळातदेखील तितक्यात ताकदीने जतन करण्याचा प्रयत्न आदिवासीबांधव करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हा सण आदिवासीबांधव येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. याप्रमाणे आजही आदिवासी पुरुष व महिलांनी एकत्र येऊन वसुबारस पारंपरिक पद्धतीने नाचगाणी म्हणून साजरी केली. वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या मैदानावरील तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वसुबारस साजरी करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात १४ वर्षांपासून वसुबारस केली जात आहे. यंदाचे हे पंधरावे वर्ष असून सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आदिवासी जिल्ह्याची ओळख व संस्कृतीचे प्रतीक कुलदैवत तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी तारपा नृत्य सादर केले. आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा (भांगरे) यांना अभिवादन करण्यात आल्याचे भुयाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळीthaneठाणे