शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

ठाणे : कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय ...

ठाणे : कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ठाणेकरांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. याबाबत महापालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट साधी तसेच गणेशमूर्ती सार्वजनिक मंडळासाठी चार फूट व घरगुती गणपतीसाठी दाेन फुटांच्या मर्यादेत असावी. तसेच शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर मूर्तीचे पूजन करावे, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास ते कृत्रिम स्थळी करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे. वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच आरोग्य व सामाजिक संदेश असणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे घ्यावीत. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचे महापालिकेने सूचित केले आहे. शासनाने लागू केलेल्या ‘लेवल ऑफ रेस्ट्रिक्शन फॉर ब्रेकिंग द चेन’बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियम व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे. श्रीगणेश दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंग आवश्यक

गणपती मंडपात निर्जंतुकीकरण, तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था असायला हवी. प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतर आणि स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक काढू नये, असेही पालिकेने म्हटले आहे.