शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई, इंग्रजी माध्यमांसोबत 'मराठी'कडे पाठ नको!; मनसेची सूचना

By अजित मांडके | Updated: March 31, 2023 17:20 IST

मनसे नेते अविनाश जाधव यांची ठाणे महापालिकेला सूचना

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिकेमार्फत सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमांच्या नविन शाळा सुरु करणे नियोजित आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातही महापालिकेने कोट्यवधीची तरतुद केली आहे. ठाण्यातील गोरगरीब विद्यार्थ्यासाठी महापलिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे हे पाऊल स्तुत्य असले तरी 'मराठी' शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये. अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. इंग्रजीचा सोस असला तरी, मराठी शाळांच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत. असेही त्यांनी म्हटले आहे.

ठाणे महापालिकेच्या ४ हजार ३७० कोटींच्या अर्थसंकल्पात शिक्षणाला झुकते माप दिले असुन महापलिकेमार्फत सीबीएसई शाळा सुरू करण्याचे तसेच, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या पालिकेच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत ठाण्यात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या ७ शाळा आहेत. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे असला तरी सर्वसामान्य कुटुंबांना हे शिक्षण आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड असलेल्या सीबीएसई बोर्डामधून शिक्षण घेण्यासाठी ठाण्यात प्रामुख्याने केवळ खाजगी शाळांचे महागडे पर्याय उपलब्ध आहेत.तेव्हा, इंग्रजी माध्यमा बाबत महापालिकेचे हे पाऊल स्तुत्य असले तरी 'मराठी' भाषा आणि मराठी शाळांकडे महापालिकेने पाठ फिरवु नये.

इंग्रजी शाळा सुरु करत असताना मराठी माध्यमातील शाळांचे बळकटीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. सध्या ठाण्यात मराठी शाळा बंद होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील महापालिकेच्या मराठी शाळांमधील विदयार्थ्यांची पटसंख्या वाढविणेसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. अशी सूचनाही त्यांनी केली.

ठाण्यात महापालिकेच्या शाळा आहेत. मात्र काही शाळेची अवस्था दयनीय झाली असून बदलते ठाणे अभियान अंतर्गत मराठी शाळांची डागडुजी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात यावी. विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे वर्ग बनवण्यात यावे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना योग्य सुविधासह शौचालयाकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी जाधव यांनी करत अर्थसंकल्पात केलेली घोषणा सत्यात उतरवण्यासाठी पालिका आयुक्तांनी प्रयत्न करावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच पाठिंबा राहील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणे