शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चून होणार ‘कावेरीसेतू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:58 IST

कळव्यात सुशोभीकरण : ब्रिटिशकालीन टेबल, खुर्च्या

ठाणे : ठाण्यातील तलावपाळी किंवा रोषणाईने चमचमणारे मॉल याकडे विरंगुळ्याकरिता ठाणेकरांचा ओढा असताना ठाण्यालगतच्या कळवा या तुलनेने कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या परिसरात तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील रस्त्यावर ‘कावेरीसेतू’ उभा राहत आहे. ब्रिटिशकालीन खुर्च्या, आकर्षक महागडे दिवे, शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा, आकर्षक रंगरंगती असा या सेतूच्या परिसरातील थाट असणार आहे. सकाळी व सायंकाळी कळव्यातील किंवा अगदी ठाण्यातील मंडळींनी तेथे विरंगुळ्याकरिता दोन घटका बसावे, अशी या सेतूच्या उभारणीमागील कल्पना आहे.

कळव्यात पूर्वी अरुंद असलेले रस्ते आता रुंद तर झाले आहेतच, पण सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांमुळे बाह्यरस्तेसुद्धा एकमेकांना जोडले गेले आहेत. ९० फुटांचा रस्ता हा तर खारेगावची नवी ओळख मानला जात आहे. त्याच भागात पारसिक चौपाटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येथील अर्थकारण बदलले आहे. ठाण्यातील घोडबंदर, वर्तकनगर, पोखरण या ठिकाणी जागेला किंवा फ्लॅटला जो दर मिळत आहे, तोच दर कळव्यात सुरू आहे.

स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून उभ्या राहत असलेल्या कावेरीसेतूमुळे कळव्याला नवी ओळख प्राप्त होत आहे. कळवा स्टेशनला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणूनही हा सेतू ओळखला जाऊ लागला आहे. येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकरिता झाडांच्या सावलीत, पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये गप्पा मारण्यासाठी ब्रिटिशकालीन टेबल, खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. शिवाय, पाठीमागील बाजूस एक भिंतीचा आकार तयार करून त्यावर शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन पथदिवे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांचा किंवा थबकणाºयांचा रेल्वे प्रवासाचा थकवा काही क्षणांतच दूर होणार आहे. सायंकाळच्या वेळी परिसरातील वादक येथे गिटार किंवा व्हायोलीनचे मंद सूर आळवत असतील आणि रसिक त्यांचा आस्वाद घेतील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. याठिकाणी नाल्यावरील भिंतीवर या भागातील कलाकारांना रोजच्या रोज आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विरंगुळ्यासाठी होणार नवे केंद्रकाही वर्षांपूर्वी कळवा, खारेगावची ओळख अतिशय गजबजलेले, वाहतूककोंडीचे, अनधिकृत इमारतींचे आणि विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित ठिकाण म्हणून होती. मागील पाच वर्षांत ती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी कळवा स्टेशनवरून रिक्षाने येताना पूर्णपणे वळसा मारून यावे लागत होते. परंतु, आता या सेतूमुळे हे अंतर अगदी काही मिनिटांवर आले आहे. नाल्यावर उभारण्यात आलेला हा रस्ता आता विरंगुळ्याचे नवे केंद्र होत असल्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे.